Monday, August 8, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, एम. योगा ॲपची घोषणा

Surajya Digital by Surajya Digital
June 21, 2021
in Hot News, देश - विदेश
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, एम. योगा ॲपची घोषणा
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी M – Yoga हे ॲप लाँच केल्याची घोषणा केली. या ॲपच्या माध्यामातून जगभरातील लोकांना वेगवेगळ्या भाषेत योगा शिकता येणार आहे. योग दिनी पंतप्रधान मोदींनी वन वर्ल्ड वन हेल्थ असा नारा दिला. भारताने जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून M Yoga App तयार केलं आहे. 12 ते 65 वर्षे वयोगटातील व्यक्ती या ॲपच्या माध्यमातून योगा शिकू शकतात असं WHO ने म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनी संबोधित करताना म्हटलं की, जेव्हा भारताने संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता तेव्हा त्यामागे संपूर्ण जगाला योगा सहजपणे माहिती व्हावा हीच भावना होती.

अब विश्व को, M-Yoga ऐप की शक्ति मिलने जा रही है।

इस ऐप में कॉमन योग प्रोटोकॉल के आधार पर योग प्रशिक्षण के कई विडियोज दुनिया की अलग अलग भाषाओं में उपलब्ध होंगे: PM @narendramodi #YogaDay

— PMO India (@PMOIndia) June 21, 2021

या ॲपचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील विविध भाषांमध्ये आपण योगा शिकू शकतो. योगा करणे आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे, हे संपूर्ण जगाला कळले आहे. कारण कोरोनामध्ये आपल्या शरीराची ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगा फायदेशीर ठरला. एम. योगा ॲपची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एम. योगा अ‍ॅपव्दारे जगामध्ये योगाचा प्रसार आणि प्रचार होईल. वन वर्ल्ड वन हेल्थ या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी या ॲपमुळे मदत मिळेल.

Prime Minister launched the #MYOGAapp, jointly developed by @WHO & @moayush. Provides users a collection of videos & audio sessions.
Available in many world languages, the app is a classic eg. of fusion of modern technology & ancient science @iccr_hq @IndianEmbJkt @mygovindia pic.twitter.com/6xgVSc3ATd

— India In Medan (@indiainmedan) June 21, 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दर वर्षी 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून राज्यातील 2 हजार 700 पेक्षा अधिक ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत असतो. मात्र, यंदा कोरोनाचं संकट असल्याने कोणताही सार्वजनिक कार्यक्रम झाला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तम आरोग्यासाठी योगसाधनेचे महत्व लोकांना समजणे आवश्यक आहे. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, योगाची माहिती फ्रेंच, इंग्लिश, हिंदीसह संयुक्त राष्ट्रांच्या भाषेमध्ये येत्या काही महिन्यात उपलब्ध होणार आहे. ॲप सुरक्षित असून युजरचा कोणताही डेटा यातून घेतला जात नाही. 12 ते 65 वर्षे वयोगटातील व्यक्ती या ॲपच्या माध्यमातून योगा शिकू शकतात असंही WHO ने म्हटलं आहे.

योगामुळे माणसाला दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांनी योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत अन्य देशांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

नेटिझन्स म्हणतात… 'बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षाही सुंदर क्रिकेटपटू' https://t.co/ieQVKsx1zx

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021

यंदाच्या योग दिनाची थीम ही योगा फॉर वेलनेस आहे. योगदिनाच्या शुभेच्छा देताना मोदींनी ट्विटरवर म्हटलं की, ‘योगा फॉर वेलनेस’ योगामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते. आजार असेल तर तो शोधा, त्याच्या मुळापर्यंत जा आणि त्याचा उपचार निश्चित करा असं महात्म्यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या या संकटात योगाचा इम्युनिटीवर होणाऱ्या सकारात्मक परिणामावर संशोधन सुरु आहे. अनेक कोरोना रुग्णांनी योगा केला. कोरोना काळात योग करणं गरजेचं असल्याचंही मोदींनी सांगितलं.

लॉकडाऊन समाप्त; तेलंगणा राज्य सरकारची घोषणा https://t.co/E8NLJGlMvT

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021

Tags: #PM #NarendraModi's #announcement #mYoga #App#पंतप्रधान #नरेंद्रमोदींच्या #पुतणीला #भाजपने #महापालिका #निवडणुकीचे #तिकिट #नाकारले #वाचासविस्तर
Previous Post

नेटिझन्स म्हणतात… ‘बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षाही सुंदर क्रिकेटपटू’

Next Post

योग दिवस स्पेशल : मराठमोळ्या अभिनेत्रीनं सर्वांचंच लक्ष वेधलं

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
योग दिवस स्पेशल : मराठमोळ्या अभिनेत्रीनं सर्वांचंच लक्ष वेधलं

योग दिवस स्पेशल : मराठमोळ्या अभिनेत्रीनं सर्वांचंच लक्ष वेधलं

Comments 6

  1. best christmas tree lights says:
    7 months ago

    I want to thank you for the excellent post!! I certainly liked every bit of it. I’ve bookmarked your web site so I can take a look at the latest articles you post later on.

  2. Katelin Schlepp says:
    6 months ago

    What?s Going down i’m new to this, I stumbled upon this I have found It absolutely useful and it has aided me out loads. I hope to give a contribution & help different customers like its aided me. Great job.

  3. best liquid baby formula says:
    6 months ago

    I am glad to be one of the visitants on this great website (:, thanks for putting up.

  4. best electric hole punch says:
    6 months ago

    very good put up, i actually love this web site, keep on it

  5. DevOps Companies in Dallas says:
    4 months ago

    785167 316999Jane wanted to know though your girl could certain, the cost I basically informed her she had to hang about until the young woman seemed to be to old enough. But the truth is, in which does not get your girlfriend to counteract making use of picking out her really own incorrect body art terribly your lady are generally like me. Citty style 13198

  6. DevOps new trends says:
    4 months ago

    472552 622483Spot ill carry on with this write-up, I truly feel this web site requirements a fantastic deal much more consideration. Ill oftimes be once far more to see far much more, a lot of thanks that info. 423254

वार्ता संग्रह

June 2021
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697