Friday, August 12, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

अभिनेत्री यामी गौतमला ईडीचे समन्स; अटक होण्याची शक्यता

Surajya Digital by Surajya Digital
July 2, 2021
in Hot News, टॉलीवुड
4
अभिनेत्री यामी गौतमला ईडीचे समन्स; अटक होण्याची शक्यता
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिच्या अडचणी वाढल्या आहेत. यामीला ईडीने मोठा दणका दिला आहे. विदेशी चलन व्यवस्थापन अधिनियम कायद्याअंतर्गत हे समन्स बजावण्यात आले आहे. याच अंतर्गत तिची चौकशी केली जाणार आहे. यामीने काहीतरी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय ईडीला आहे. यावेळी जर ती चौकशीसाठी हजर राहिली नाही तर तिला अटकही केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणारी अभिनेत्री म्हणजे यामी गौतम. यामीने आताच काही दिवसांपूर्वी लग्न केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या लग्नाच्या फोटोंचा धुमाकूळ चालला आहे. या बातम्यांमधून ती बाहेर पडते न पडते, तर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता यामी बाबत अशी बातमी समोर आली आहे की, ईडीने यामीला चौकशीसाठी बोलावले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या प्रकरणावर सूत्रांचे असे म्हणणे आहे की, विदेशी चलनाचे काही व्यवहार यामी गौतमच्या बँक खात्याशी जोडले आहे. त्यामुळे प्राथमिक चौकशीनंतर आता ईडीने यामीला ७ जुलैला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यावर साक्ष देण्यासाठी तिला बोलावले आहे.

यामीने मागील महिन्यात ‘उरी’ दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले आहे. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. तिने कोणालाही पूर्व कल्पना न देता हे लग्न केले होते.

यामीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती अभिषेक बच्चन सोबत ‘दसवी’ या चित्रपटात दिसणार आहे. यामीने तिच्या करीअरची सुरुवात २०१२ साली रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘विकी डोनर’ मधून केली आहे. यानंतर तिने ‘उरी’, ‘काबिल’, ‘सनम रे’, ‘गिनी वेड्स सनी’, ‘बदलापूर’ आणि ‘बाला’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे.

Tags: #ED #summons #actress #YamiGautam #Possibility #arrest#अभिनेत्री #यामीगौतम #ईडीचे #समन्स #अटक #शक्यता
Previous Post

बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला, 30:30:40 या सूत्राच्या आधारे

Next Post

सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार

सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार

Comments 4

  1. zortilo nrel says:
    9 months ago

    Wonderful web site. A lot of helpful information here. I?¦m sending it to some pals ans additionally sharing in delicious. And of course, thank you on your effort!

  2. best wood glue says:
    7 months ago

    I have been exploring for a little for any high quality articles or weblog posts on this kind of space . Exploring in Yahoo I ultimately stumbled upon this site. Studying this information So i’m happy to exhibit that I’ve a very just right uncanny feeling I discovered just what I needed. I so much definitely will make sure to don’t forget this web site and provides it a glance on a constant.

  3. Dexter Blechinger says:
    6 months ago

    You need to take part in a tournament for starters of the finest blogs on the web. I will suggest this website!

  4. air compressors faq says:
    6 months ago

    Substantially, the post is in reality the greatest on this deserving topic. I concur with your conclusions and also will certainly eagerly look forward to your future updates. Saying thanks definitely will not simply just be adequate, for the exceptional clarity in your writing. I definitely will promptly grab your rss feed to stay abreast of any updates. Pleasant work and also much success in your business dealings!

वार्ता संग्रह

July 2021
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Jun   Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697