सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता रविवारच्या (ता. 4) मराठा आक्रोश मोर्चासाठी आम्ही पोलिसांकडे परवानगी मागितली आहे, मात्र ती अद्याप मिळालेली नाही. परवानगी मिळो अथवा ना मिळो, आम्ही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून मोर्चा काढणारच, अशी भूमिका अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मोर्चाचे नेतृत्व करणारे नरेंद्र पाटील शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रविवार ४ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सोलापुरात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील हा सर्वात मोठा मोर्चा राहणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला, 30:30:40 या सूत्राच्या आधारे https://t.co/mTDm5SdPzF
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 2, 2021
मोर्चासाठी आम्ही पोलिसांकडे परवानगी मागितली आहे, पण अद्याप परवानगी मिळाली नाही. मोर्चा काढण्याबाबत “प्लॅन ए’ तयार आहे, पण परवानगी न मिळाल्यास “प्लॅन बी’ ठरवणार, असे सांगतानाच पाटील यांनी “प्लॅन बी’विषयी तपशील देण्यास जाणीवपूर्वक टाळले.
केवळ मराठा समाजच नाही तर शेतकरीही या मोर्चात सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चासाठी आम्ही खासदार नारायण राणे, छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निमंत्रण दिल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याशिवाय केंद्रीय कायदा मंत्री यांची भेटीसाठी वेळ घेऊन त्यांना मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यासाठी विनंती करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
या आंदोलनासाठी आम्ही छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवेंद्रराजे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नारायण राणे यांना आमंत्रित केले आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची यासंदर्भात भेट घेतली. काही लोक या मोर्चाला राजकीय रंग देऊ पाहात आहेत, पण हा मोर्चा सर्वपक्षीय आहे. राज्यात सत्ता कोणाचीही असो, आंदोलनाचा पवित्रा कायम राहणार आहे.
केंद्र शासनाने राज्याने नेमलेली गायकवाड समिती बरखास्त केली आहे म्हणून मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने नवीन मागासवर्गीय आयोग नेमून सर्व्हे करावा. अन्य राज्यांनी अतिरिक्त वा वाढीव आरक्षणाबाबत केंद्राकडे परवानगी घेतली म्हणून त्यांच्या राज्यातील आरक्षण अबाधित आहे, त्यामुळे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील अशी परवानगी घेतल्यास आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो, असे मत नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
देहू : छत्रपती संभाजीराजे विठ्ठल भक्तीत दंग…वारकऱ्यांसोबत भजन आणि खेळली फुगडी… #देहू #भजन #surajyadigital #फुगडी #सुराज्यडिजिटल #दंग #संभाजीराजेhttps://t.co/fRitTaaD2F
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 1, 2021
मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात संभाजीराजे पाठीशी का नाहीत, असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला असता, पाटील म्हणाले, पूर्वी आंदोलनाबाबतच्या प्रक्रियेत ते सामील होते. पण आता आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकारचे केलेले कौतुक मला पटले नाही. आरक्षण मिळावे व यासंदर्भातील सर्व योजनांची अंमलबजावणी व्हावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.