बीड : छत्रपती संभाजी राजे हे शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना एका तरुणाने प्रश्न केला. त्यावर ‘जो प्रश्न तुम्ही मला विचारताय, तोच प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. हा प्रश्न तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांनासुद्धा विचारला पाहिजे. पण तुम्ही तिथे विचारत नाही. मला विचारायचा असेल तर मला मुख्यमंत्री करा’, असं ते म्हणाले.
बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला, 30:30:40 या सूत्राच्या आधारे https://t.co/mTDm5SdPzF
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 2, 2021
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाच्या पुढाकाराने शुक्रवारी बीड येथे मराठा आरक्षण जनसंवाद झाला. जनसंवाद कार्यक्रमाला संबोधन झाल्यानंतर संभाजीराजे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी येथील एका तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देताना संभाजीराजे यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा आहे.
ओबीसी समाजातून आरक्षण का नको? असा प्रश्न एका तरूणाने संभाजीराजे यांना विचारला. प्रश्न विचारणारा तरुण या सर्वाचं मोबाईलवर रेकॉर्डिंग करत होता. हे पाहून संभाजीराजे छत्रपती यांनी त्याला हीच मागणी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाची असल्याचं सांगितलं. या प्रश्नानंतर जनसंवाद कार्यक्रमात काही काळ थोडा तणाव तणाव निर्माण झाला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापुरात रविवारी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार https://t.co/vHWh7IX3Hk
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 2, 2021
त्यानंतर मात्र प्रश्न विचारणाऱ्या तरूणाला छत्रपती संभाजीराजे यांनी व्यासपीठावर समोर उभं करून समजावून सांगितलं. ते म्हणाले की, ‘जो प्रश्न तुम्ही मला विचारत आहात, तोच प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारा. उपमुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांनासुद्धा विचारला पाहिजे. पण तुम्ही विचारत नाही. मला विचारायचा असेल तर मला मुख्यमंत्री करा.’, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. पण, हे वाक्य संपत असतानाच मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. मला बहुजन समाजाला न्याय द्यायचा आहे, अशी भूमिकासुद्धा त्यांनी बोलून दाखवली.
* समाजाला रस्त्यावर आणून, त्यांना वेठीस धरू नका
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने दाखल केलेली फेरआढावा याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता मोठी कसोटी आहे. पक्षविरहित सर्वांनी एकत्र येऊन केंद्रापर्यंत आवाज पोचवावा लागेल. यासाठी नेतृत्वच नाही तर पुढाकार घेणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. केंद्राने अध्यादेश काढून घटनेत दुरुस्ती करावी, यासाठी सर्व खासदारांना एकत्र करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले. ‘समाजाला रस्त्यावर आणू नका. त्यांना वेठीस धरू नका. तुम्ही समाजासाठी काय करणार ते सांगा. आता केवळ राज्यपालांना पत्र देऊन उपयोग नाही. मागासवर्ग आयोगाकडून समाजाचे फेरसर्वेक्षण करायला हवे. समाजाचा मागासवर्ग प्रवर्गात समावेशाच्या शिफारशीचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर होणे गरजेचे आहे, असे संभाजीराजे म्हणाले.
देहू : छत्रपती संभाजीराजे विठ्ठल भक्तीत दंग…वारकऱ्यांसोबत भजन आणि खेळली फुगडी… #देहू #भजन #surajyadigital #फुगडी #सुराज्यडिजिटल #दंग #संभाजीराजेhttps://t.co/fRitTaaD2F
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 1, 2021