मोहोळ : शेटफळ जवळील संकेत हॉटेलजवळ रस्त्यावर एका वाहनाला अडवून त्यात मला पुढच्या गावाला नेऊन सोडा, असे म्हणत तीन महिला बसल्या आणि ड्रायव्हरने पाठीमागे बसा असे म्हणत असताना त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्या गाडीतील 3 लाख 20 हजार रुपये चोरून नेल्याची फिर्याद मोहोळ पोलिस स्टेशनला नोंद झाली आहे.
सोलापूर : मराठा आक्रोश मोर्चातील काही क्षणचित्रे, पोलिसांत आणि आंदोलकांमध्ये तणाव #solapur #MarathaReservation #सोलापूर #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/nJcSZeRZYr
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021
याबाबत पोलिसांनी सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मोहम्मद मुस्ताक मोहम्मद धारूल हा शेळ्या मेंढ्याचा व्यापारी आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे स्वतःचे चारचाकी वाहन नंबर ए एक्स 9014 या पिकपमधून चालक सुलतान रमजान तांबोळी असे दोघे जण करमाळा येथे शेळ्या आणण्यासाठी निघाले होते. त्यांनी रियाज धारूल अब्दुल महाडिक या व्यापाऱ्याकडून आणि स्वतः जवळची काही रक्कम अशी मिळून तीन लाख वीस हजार रुपये घेऊन करमाळाकडे निघाले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापुरात संचारबंदी झुगारुन आंदोलक मोर्चात सहभागी, पुढचा मोर्चा प्रशासनाला न सांगता काढला जाईल – नरेंद्र पाटील
https://t.co/IOMYzOG3dA— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021
वाटेत शेटफळजवळील संकेत हॉटेल जवळ आले, तिथे रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन महिला व सोबत दोन लहान मुले यांनी या पिकअपला हात करून थांबवले आणि आम्हाला मोडनिंब येथे जावयाचे आहे, असं सांगितले. त्यांना दरवाजा उघडून आत बसण्यास सांगितले. त्या वेळी दोन महिला पिकअपमधील पुढच्या सीटवर बसल्या आणि एक खालीच थांबली, त्यांना पाठीमागे बसा असे म्हटले असता त्यांनी आम्हाला जायचे नाही, असे सांगितले. त्याच वेळी पुढे बसलेल्या महिला देखील खाली उतरल्या.
मराठा आक्रोश मोर्चा : आमदार आवताडे, कल्याणशेट्टी, मोहिते – पाटील यांनी केले ठिय्या आंदोलन https://t.co/3Az6IYo8sf
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021
फिर्यादी पुढे निघून गेले. काही अंतरावर गेल्यावर अरण (ता. माढा ) या गावाजवळ गेल्यावर चालकाने मालकाला पैसे आहेत का ? असे विचारणा केली तेव्हा गाडीच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले 3 लाख 20 हजार रुपये तेथे नसल्याचे त्यांना समजले. त्यांनी लगेचच महिला ज्या ठिकाणी सोडल्या त्या ठिकाणी येऊन पाहिले असता तेथे कोणीही नव्हते. त्यांनी तडक मोहोळ पोलिस स्टेशनला येऊन पैसे चोरीची फिर्याद दिली. या घटनेचा तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1411622815690723334?s=19