बार्शी : मारामारीत जखमी झाल्यानंतर उपचार सुरु असताना दोघांनी स्टाफला शिवीगाळ करुन तोडफोड करुन हॉस्पिटलचे नुकसान केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुविधा हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे प्रभारी लहू रामहरी गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन, या लिंकवर करा अर्ज https://t.co/8juXtyJYKF
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
सुविधा हॉस्पिटलमध्ये दुपारी सव्वातीन वाजण्याचे सुमारास संदिप बाळासाहेब पवार (रा. बार्शी) हा त्याच्या डोकीस मारामारीत जखम झाल्याने मित्रासोबत उपचारासाठी आला होता. त्यास अतिदक्षता विभागातील खाटेवर झोपवून डॉ. खुने, डॉ.मोनाली, नर्स विशाखा चौधरी, आरती कसबे, अनिकेत उदगिरे, राजकुमार कोनदे , राणी गोरे हा स्टाफ उपचार करत होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यावेळी त्याच्या मित्राने संदिपवर लवकर उपचार करा, म्हणत शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर संदिप पवार शिव्या देत बेडवरून उठला व तेथील लोंखडी स्टुल हातात घेवुन मोठमोठ्याने ओरडून तुम्हा सर्वांना जीवे मारतो म्हणत त्याने दरवाजाच्या काचा, पार्टिशन व मेडिसिन ट्रॉली फोडून टाकली. डॉ. खुने हे त्यांना असे करू नका म्हणून सांगत असताना त्यांना स्टुल फेकुन मारला. तो त्यांच्या पायास लागला.
'कोणीही नाराज नाही; मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका', यांचा पारा वाढला https://t.co/VLPMVcK69l
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
त्यानंतर त्याने हातात प्लॅस्टीक बादली घेवुन ती राजकुमार कोनदे यांचे हातावर व पाठीवर मारली. त्यास दरवाजाच्या काचेवर ढकलून दिले. त्यामुळे त्यास डाव्या हातास काच लागुन जखम झाली. त्यानंतर हॉस्पीटलचे व्यवस्थापक ज्योती जगताप व बाकीचे इतर डॉक्टर व स्टाफना जीवे मारण्याची धमकी देवुन शिवीगाळी केली. या तोडफोडीत हॉस्पिटलचे सुमारे 25 हजाराचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
इंधनदरवाढीने त्रस्त #vairalphoto – इंधन दरवाढीने सामान्य नागरिकाचे कंबरडे मोडले आहे. हे दर्शवणारे एक चित्र चांगलाचा व्हायरल झाला आहे. #surajyadigital #fuel #पेट्रोल #सुराज्यडिजिटल #इंधन #FuelPriceHike pic.twitter.com/FHBUNfir9s
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021