नाशिक : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे गटात कमालीची नाराजी असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावर आता उत्तर दिले आहे. त्यांना या अफवा असून बदनामी केली जात असल्याचा आरोप केलाय.
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन, या लिंकवर करा अर्ज https://t.co/8juXtyJYKF
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून मुंडे भगिनी नाराज, हे कोण म्हणत आहे. अशी काहीही चर्चा नाही. मंत्रिपद वाटपाचा निर्णय, पक्ष वरीष्ठ स्तरावरून घेतला जात असतो. त्यामुळे मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, असे त्यांनी नाशिकमध्ये विधान केले.
मंत्रिमंडळ विस्तारावरून मुंडे भगिनी अजिबात नाराज नाहीत. त्या नाराज आहे असे कोण म्हणतय? असा प्रतिप्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांचा पारा वाढला होता. काल मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुंडे भगिनी नाराज असल्याच्या बातम्यांना पेव फुटले. मंत्रिमंडळ विस्तार असो की पद नियुक्ती याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेतला जातो. त्यात कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मंत्र्यांना चांगली खाती मिळाली आहेत. यामुळे त्याचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी नक्कीच होईल. नारायण राणे यांना त्यांच्या कार्यक्षमतेमुळे मंत्रिमंडळात घेतले असावे, असे त्यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या फोटोला काय सुचवाल…
– मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तार यादीत नारायण राणेंच नाव पहिलं; शिवसेनेवर नेम धरण्यासाठी.. #cabinet #surajyadigital #सुराज्यडिजिटल #rane #Modi #Shivsena #शिवसेना pic.twitter.com/jAiZsHH2GZ— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
राज्यात शिवसेनेला डिवचल्याचा फायदा नारायण राणेंना मिळत असल्याची प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर देवेंद फडणवीस यांनी या आरोपांवर आक्षेप घेतला. नारायण राणेंची क्षमता पाहून मंत्रिपद मिळाले असल्याचे फडणवीस आवर्जून म्हणाले. नारायण राणेंना केंद्रात घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यातील युतीच्या चर्चेची शक्यता मावळली आहे का? असे विचारण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितले की, अशा चर्चेने काही होत नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नारायण राणेंसह या मंत्र्यांनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ, 43 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथhttps://t.co/2qmYFLKgW2
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021
प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त आहे. शपथविधी पार पडल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी अभिनंदनाचं ट्वीटदेखील केलं नसल्याने या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. वारसा आणि प्रस्थापित यापेक्षाही भाजप पक्षात संधी मिळते हा संदेश दिला जात आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय राहिलेले डॉ. कराड यांना पहिल्यांदाच राज्यसभा आणि वर्षभरातच थेट मंत्रीपद मिळाल्याने मुंडे भगिनी समर्थकांना नेमके काय व्यक्त व्हावे, असा प्रश्न पडला आहे.
पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी केंद्रातील किंवा राज्यातील कोणत्याही मंत्र्याचं अभिनंदन केलं नसून त्या नाराज असल्याची चर्चा असल्याचं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पत्रकार परिषदेत विचारला होता. यावर दरेकर यांनी, अभिनंदन केलं नाही किंवा ट्विट केलं नाही असं सांगताना त्यांनी कुठे नाराजीदेखील व्यक्त केलेली नसल्याचे म्हणत याकडेही लक्ष द्यावं लागेल, असे चाणाक्ष उत्तर दिले.