श्रीपूर : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२० – २१ मध्ये गाळप केलेल्या उसास यापूर्वी पहिला हप्ता रुपये २१०० प्रमाणे अदा केलेला असून आज रोजी रुपये १३१ प्रति मे.टन प्रमाणे दुसऱ्या हप्ताची एकूण रक्कम रुपये १४ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली आहे.
सोलापूरच्या 'मार्शल लॉ' वर 6 तासाची वेब सिरीज येणार https://t.co/L2iQcDw2Qm
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळपास आलेल्या उसाचे एकंदरीत प्रति टन रुपये २२३१ प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली. श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
बार्शीच्या सुविधा हॉस्पिटलमध्ये तोडफोड, दोघांविरोधात गुन्हा दाखल https://t.co/qpaKnXQRMb
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये कारखान्याने १० लाख ६ हजार ७७० मे. टन ऊस गाळप करून ११.४४ टक्के सरासरी साखर उताराने ११ लाख १३ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेऊन कारखान्याने उद्दिष्टपूर्ती केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन, या लिंकवर करा अर्ज https://t.co/8juXtyJYKF
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी covid-19 या परिस्थितीमुळे आर्थिक संकटात असताना श्री पांडुरंग कारखान्याने मात्र गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या उसास दुसरा हप्ता प्रति टन १३१ प्रमाणे ऊस बिल दिल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील हंगाम पुर्व मशागतीचे कामे करण्याकरिता आर्थिक मदत होणार आहे, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या फोटोला काय सुचवाल…
– मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तार यादीत नारायण राणेंच नाव पहिलं; शिवसेनेवर नेम धरण्यासाठी.. #cabinet #surajyadigital #सुराज्यडिजिटल #rane #Modi #Shivsena #शिवसेना pic.twitter.com/jAiZsHH2GZ— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
गाळप हंगाम २०२० – २१ मध्ये केंद्र शासनाच्या FRP धोरणानुसार कारखान्याची FRP रुपये २४३१ प्रति मे टन असून कारखान्याने या गाळप हंगामात गाळप केलेल्या ऊसास रक्कम रु.२२३१ प्रति मे टन अदा केले असुन उर्वरित FRP रक्कमही लवकरच देणार आहे.
'कोणीही नाराज नाही; मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका', यांचा पारा वाढला https://t.co/VLPMVcK69l
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
गळीत हंगाम २०२१-२२ साठी कारखान्याकडे जवळपास १४ हजार हेक्टर ऊसाची नोंद असुन यामधून ११ ते १२ लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवलेले आहे. गळीत हंगाम २०२१-२२ सुरू करण्याच्या दृष्टीने कारखान्यांमधील कामे प्रगतीपथावर असून ती लवकरच पूर्ण होऊन गाळप हंगाम वेळेवर सुरू केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी तोडणी व वाहतूक यंत्रणा सक्षम पणे उभारली आहे.