मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांची संधी हुकल्याने माजी आमदार पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत घेत या सर्व झडत असलेल्या चर्चा फेटाळल्या आहेत. मी पक्षावर नाराज नाही, पक्षाने जे निर्णय घेतले ते मला मान्य आहेत, मंत्रिपदाची मागणी आम्ही केली नव्हती, असेही त्या म्हणाल्या. यावेळी गोपिनाथ मुंडे यांच्याविषयी बोलताना पंकजा मुंडे चांगल्याच भावूक झाल्या.
सायटोमगलो व्हायरसची भीती, सहाजणांना बाधा; लक्षणे आणि विषाणू कसा पसरतो ? https://t.co/kdrx2QBbdO
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
गोपीनाथ मुंडे यांचा अनेक राजकीय कार्यकर्त्यांवर प्रभाव आहे. मुंडे कुटुंबावर प्रेम आहे. त्यामुळं समर्थकांमध्ये नाराजीची भावना असेल हे मी नाकारू शकत नाही. मात्र, माझ्या मनात किंवा कुटुंबामध्ये तशी कुठलीही नकारात्मक भावना नाही, असं पंकजा यांनी स्पष्ट केलं. ही सर्व चर्चा निराधार असल्याचं स्पष्ट केलं. सर्व मंत्र्यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केल्याचंही पंकजा यांनी यावेळी सांगितलं.
Pritam Munde and I never demanded anything (Ministerial Berth). I have no differences with those who have taken the oath as they are also the followers of Gopinath Munde: Pankaja Munde on her sister not getting a Ministerial berth during Union Cabinet expansion pic.twitter.com/H2DITFIrVU
— ANI (@ANI) July 9, 2021
मुंडे कुटुंबाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातं याबाबत काय वाटतं असं विचारलं असता पंकजा मुंडे यांनी, ‘असं काही मला वाटत नसल्याचे म्हटले. मुंडे साहेबांचा प्रभाव फक्त मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातच नाही, देशातील अनेक भागांमध्ये आहे. तो कमी करण्याचा प्रयत्न होतोय असं वाटत नाही आणि तसा तो झाला तर त्यांचा उलट प्रभाव वाढेल, असे म्हणाल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रकाश आंबेडकर ICU मध्ये, तातडीने बायपास सर्जरी, ऐका मेडिकल बुलेटिन https://t.co/3DNiaGRhZF
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर टीका-टिप्पणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सर्व गोष्टींवर खुलासा केला. ‘समर्थकांमध्ये नाराजीची भावना असू शकते, पण व्यक्तिश: पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. मी अजिबात नाराज नसल्याचे आवर्जून ‘ पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.
खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 7, 2021
‘मुळात प्रीतमला मंत्रिपद मिळावं अशी मागणी आम्ही केली नव्हती. त्यांचं नाव चालवलं जात होतं हे खरं आहे. तशी अनेकांची नावं घेतली जात होती. पण ती खरी ठरली नाहीत. त्यामुळं आम्ही नाराज झालो असं समजण्याचं काही कारण नाही,’ असं त्या म्हणाल्या.
* भागवत कराडांचा आला होता फोन
यावेळी पंकजा मुंडे यांनी मंत्र्यांचं अभिनंदन का केलं नाही याचंही कारण सांगितलं. परवा केवळ संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ठोस काही येत नव्हतं. त्यामुळे मी कुणाचंही अभिनंदन केलं नाही. मात्र, आता मी केंद्रीय मंत्र्यांचं अभिनंदन करते. राज्यातून मंत्री झालेल्यांचंही अभिनंदन करते, असं त्या म्हणाल्या. मी भारती पवार आणि कपिल पाटील यांच्याशीही मी फोनवरून चर्चा केली. त्यांचं अभिनंदन केलं. तसेच भागवत कराड यांनी मला रात्री साडेबारा वाजता फोन केला होता. त्यांना दिल्लीतून फोन आल्याचं आणि दिल्लीला जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
भीमा कोरेगाव : दोषारोपपत्रात संभाजी भिडे व मिलिंद एकबोटेंचं नाव नाही, शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार https://t.co/CRgfdQio2T
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
* पंकजा, प्रितम म्हणजे वंजारी समाज नाही
‘संजय राऊत हे त्यांची मतं रोखठोक मांडतात. त्यांचा स्वत:ची मतं आणि अभ्यास आहे. ते मला विचारून त्यांची मतं मांडत नाहीत. त्यांनी जे लिहिलंय ते त्यांचं मत आहे. पंकजा किंवा प्रीतम मुंडे म्हणजे वंजारी समाज नाही. वंजारी समाजातून कोणीही नेता मोठा होत असेल तर त्याला आमचा पाठिंबाच आहे. शिवाय, मंत्रिपद मिळालेले हे मुंडे साहेबांनी घडवलेलेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळं त्यांचा आम्हाला अभिमानच आहे,’ असं पंकजा म्हणाल्या.