अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पक्षाच्या कम्युनिटी हॉलचे उद्घाटन करण्यासाठी अहमदाबाद येथे सकाळी 11 वाजता गेले होते. यावेळी पोलिसांनी वेजलपूर भागातील काही सोसायट्यांतील लोकांना त्यांच्या घरांचे दरवाजे, खिडक्या बंद करण्याचे आदेश दिले होते. लोकांना बंदिस्त राहण्याची ताकीदही दिली होती. तसा मेसेज व्हायरल होत आहेत. या मेसेजमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जागतिक लोकसंख्या दिन : दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना ना नोकरी, ना भत्ता, हे असतील बंधने https://t.co/G2vmKLFMtB
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
या मेसेजनुसार पोलिसांनी सोसायटींच्या अध्यक्षांना पत्र पाठवून आदेशाचे पालन न केल्यास तर कारवाई केली जाईल, अशी ताकीद दिली होती. अहमदाबाद पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याआधी वेजलपूर भागातील काही सोसायट्यांच्या लोकांना त्यांच्या घरांचे दरवाजे, खिडक्या बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र अमित शहा जेव्हा त्याठिकाणी आले, तेव्हा उपस्थितांना हात हालवून प्रतिसाद देत होते. अनेक छोट्या बच्चे कंपनीने लवून हात जोडून नमस्कार घातला.
या मेसेजनुसार पोलिसांनी सोसायटींच्या अध्यक्षांना पत्र पाठविली आहेत. यामध्ये कम्युनिटी हॉलमध्ये अमित शहा येणार आहेत. या रस्त्यावर आणि बाजुने असलेल्या इमारतींमधील घरांचे दरवाजे आणि खिड्या बंद ठेवण्यात याव्यात. जर बंद ठेवल्या नाही तर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद या पत्रात दिली आहे. देशातील पहिल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यानंतर ते पहिल्यादाच अहमदाबादला आले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ना लसीकरण, ना कोरोना अहवाल
– लसीकरण आणि कोरोना अहवाल मिळत नसल्याने काम मिळत नसल्याने विडी महिला कामगार संतप्त, केला रास्ता रोको, काय म्हणतात ऐका…#surajyadigital #solapur #सोलापूर #रास्तारोको #सुराज्यडिजिटल #coronavirushttps://t.co/MBYBVIpcTO— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
पोलिसांनी स्वामीनारायण आणि स्वाती अपार्टमेंटसह अन्य सोसायट्यांच्या अध्यक्षांना पत्र लिहिले होते. अमित शहा यांना झे़ड प्लस सिक्युरिटी आहे, व्हीआयपी गेस्ट इथे येत असल्याने घरांचे दरवाजे, खिडक्या बंद ठेवण्यात याव्यात. असे न केल्यास कारवाई करणार की नाही याबाबत या पत्रात लिहिण्यात आले नसल्याचे पडताळणीत समोर आले आहे. मात्र, सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत लोकांना बंदिस्त राहण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती.
पोलिस अधिकारी एलटी ओडेदरा यांनी यावर खुलासा केला आहे. सोसायटीच्या लोकांना खिडक्या, दारे बंद ठेवण्याची विनंती केली आहे. अशा प्रकारे व्हीआयपी लोकांची ये-जा होते तेव्हा आम्ही लोकांना अशाप्रकारची विनंती करतो आसतो. त्यांच्यानुसार सहकार्याची अपेक्षा असते. असे न केल्यास व्हीआयपींच्या मुव्हमेंटमध्ये सुरक्षेसंबंधी बाधा येऊ शकते, असा खुलासा केला आहे.
विम्बल्डनची नवी राणी, क्रिकेटपटू अॅशली बार्टीचा इतिहास, जेतेपदाची बार्टीची पहिलीच वेळ https://t.co/xFv5ubw9oO
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021