जगभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते. ११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली. अखेर युनोने पण याची दखल घेवून १९८९ सालापासून हा दिवस जागतिक दिन म्हणून घोषित केला.वाढती लोकसंख्या हे आपल्या भारत देशासमोरील नव्हे तर संपूर्ण जगासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. जगाचे क्षेत्रफळ जेवढे आहे तेवढेच आहे त्यात काहीच वाढ होत नाही पण लोकसंख्येची वाढ प्रत्येक वर्षी भरमसाठ होत चालली आहे. परिणामी लोकांना वास्तव्यासाठी जागा कमी पडू लागली आहे.लोकसंख्या वाढीमुळे लोक रोजगाराच्या शोधात शहरांकडे वळले. एकीकडे बेरोजगारी वाढली. नोकरीच्या संधी कमी झाल्या. झोपडपट्टी वाढली. गरिबी वाढली. आरोग्याच्या सोयी अपुऱ्या पडू लागल्या. रोगराई वाढली. शैक्षणिकदृष्ट्या कमी पडून जीवनमान खालावले. लोकांच्या वाढत्या लोंढ्यामुळे शहरे फुगू लागली. प्रदूषण वाढले. पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागली. म्हणजे काय तर केवळ लोकसंख्या वाढ ही पर्यावरण, प्रदूषण, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मानवी अधोगतीला कारणीभूत ठरत आहे.
जागतिक लोकसंख्या दिन : दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना ना नोकरी, ना भत्ता, हे असतील बंधने https://t.co/G2vmKLFMtB
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
तंत्रज्ञान विकासामुळे काही लोकांना नक्कीच फायदा झाला, परंतु यामुळे बेरोजगारी, गरिबी वाढली. पर्यावरण, प्रदूषच्या समस्या निर्माण झाल्या. देशातील वाढत्या लोकसंख्येला काम, नोकरी पाहिजे, परंतु नवनव्या तंत्रज्ञान विकासामुळे मानसांची जागा यंत्रांनी घेतली. खाणीत एक मशीन शंभर लोकांची, ऑफिसमध्ये कम्प्युटर दहा लोकांचे काम करू लागले. मोबाइल, कॅमेरे आणि नवनवीन यंत्रणा आल्यामुळे कामगार, मजुरांजी गरज कमी झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतासारख्या बहुलोकसंख्या असलेल्या देशात मानवरूपी ऊर्जेचा वापर व्हायला पाहिजे होता. त्यामुळे बेरोजगारी कमी झाली असती. जीवनमान उंचावले असते, परंतु आपण या पैलूकडे लक्ष दिले नाही. हीच वाढती लोकसंख्या आज जगण्यासाठी शेतीसाठी, राहण्यासाठी, इंधनासाठी जंगल तोडून, वन्यजीवांना मारून उदरनिर्वाह करीत आहे. सरकार या वाढत्या लोकसंख्येला सोयी पुरविण्यासाठी जंगले तोडून रस्ते, रेल्वे, धरणे ,कालवे, वीजवाहिन्या, उद्योग उभारत आहे. या सर्व अनैसर्गिक विकासकामांमुळे सर्व नैसर्गिक संसाधने नष्ट होत आहेत.
We have to stop this rapidly increasing population. Otherwise a lot of troubles will arise in the coming time.#WorldPopulationDay2021 #India pic.twitter.com/0xJnltgxv4
— Jatin Makwana (@Jatin_s2005) July 11, 2021
आजच आपण लोकसंखेच्या भस्मासुराला आवळले नाही तर उद्या हीच लोकसंख्या आपला आणि निसर्गाचा विनाश करेल. पर्यावरण आणि निसर्ग टिकवायचा असेल तर लोकसंख्या कमी करणे हाच यावर उपाय आहे. सरकारने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोरत कठोर पावले उचलली पाहिजेत, त्याचबरोबर मुलगा मुलगी हा भेदभाव समाजातून नष्ट व्हायला पाहिजे. लोकसंख्या वाढ ही एक समस्या या मुद्यावर समाजामध्ये प्रबोधन होणे गरजेचे आहे. लैंगिक शिक्षण, कुटुंब नियोजन हे प्रत्येकाच्या अभ्यासाचा विषय होणे गरजेचे आहे.सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकशिक्षण,प्रबोधन आणि ‘एक कुटुंब एक मूल’ हे समीकरण ठेवल्यासच लोकसंख्या कमी होऊ शकेल. त्यासाठी कडक कायदे, विविध योजनांची गरज आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे सरकारच्या इच्छाशक्तीची गरज आहे.
धोंडपा नंदे, वागदरी – सोलापूर