सांगली : ‘चिकन दिलं तरच मी डिस्चार्ज घेईल, नाही तर इथेच राहीन,’ असा हट्ट सांगलीच्या पलूसमधील कोरोना सेंटरवरील एका रुग्णाने धरला. बडदास्तीची सवय लागलेले रूग्ण कोरोना सेंटर सोडायला तयार नाहीत. असाच एक प्रकार पलुस येथील काँग्रेस नगरसेवकांनी सुरु केलेल्या डॉ. पतंगराव कदम कोवीड केअर सेंटरमध्ये पहायला मिळाला.
चिकन मिळावं म्हणून तो नाचायलाही लागला. त्यामुळे डॉक्टर, नर्स, इतकेच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयानेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकेनाच अखेर त्याला चिकन देण्यात आलं. त्यानंतर चिकनवर ताव मारुन रुग्णाने कोरोना सेंटर सोडले. संजय सलगर असं रुग्णाचं नाव आहे. सध्या सांगलीत चिकन खाऊनच कोरोना सेंटर सोडणाऱ्या या रुग्णाची चर्चा सुरू आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
300 युनिट मोफत वीज, जुनी बिलेही माफ https://t.co/EpSu3ukpPD
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
सांगली जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता पलुस तालुक्यात नगरपरिषदेतील काँग्रेस नगरसेवकांनी कोव्हिड सेंटर सुरू केले आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या पेशंटची येथील कोरोना केअर सेटरमध्ये शाही बडदास्त ठेवण्यात येत आहे. अंडी, मटण यासह फळे भाजीपाला युक्त सकस पोषक आहार देण्यावर कोरोना केअर सेंटरवर भर दिला जातोय.
एका रुग्णाने खाण्यासाठी चक्क चिकनची मागणी केली. चिकन दिलं तरच मी कोरोना सेंटरमधून डिस्चार्ज घेईल, नाही तर इथेच राहीन असा हट्टच या पट्ट्याने धरला. एवढेच नव्हे तर चिकन मिळावं म्हणून नाचायलाही लागला. त्यामुळे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय इतकेच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयानेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण गडी ऐकेल तर शपथ! अखेर रुग्णालय प्रशासनालाच नमतं घ्यावं लागलं. या रुग्णाला त्याच्या फर्माईशीनुसार चिकन देण्यात आलं. त्यानेही चिकनवर मनसोक्त ताव मारला अन् मगच कोरोना सेंटर सोडलं.
पंकजा मुंडे मोदींच्या भेटीला; संघटनात्मक पातळीवर जबाबदारी मिळण्याची शक्यता https://t.co/w7JezU7RLh
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
इतर दाखल रुग्णांनी त्याचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं इथल्या चिकनप्रेमी रुग्णाची चर्चा शहरात चर्चिली जात आहे. सलगर रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्याची अंडी, मटण, यासह फळे भाजीपाला युक्त सकस पोषक आहार मिळत असल्याने चैनी सुरू होती. रोज घरामधील जेवण आणि इथल्या जेवणात फरक असल्याने त्याला डिस्चार्ज घ्यायला नको वाटत होते. त्याला 7 जुलै रोजी 5 वाजता डिस्चार्ज मिळाला. पण त्याने चिकन खाऊनच बाहेर पडणार असल्याचं सांगितलं. त्याने चिकनसाठी हट्टच धरला होता.
ना लसीकरण, ना कोरोना अहवाल
– लसीकरण आणि कोरोना अहवाल मिळत नसल्याने काम मिळत नसल्याने विडी महिला कामगार संतप्त, केला रास्ता रोको, काय म्हणतात ऐका…#surajyadigital #solapur #सोलापूर #रास्तारोको #सुराज्यडिजिटल #coronavirushttps://t.co/MBYBVIpcTO— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021