पुणे : महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर कशाला बोलू, असं पवार म्हणाले. तसेच सोनिया गांधी बोलल्या असत्या तर भाष्य केलं असतं, असंही ते म्हणाले.
एकनाथ खडसे काढणा-या सीडीची राज ठाकरेंना प्रतीक्षा, आरक्षणावर काय म्हणाले ? https://t.co/2wlazLaQDg
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
शरद पवार यांनी बारामतीतील त्यांच्या गोविंद बाग निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारमध्ये पाठित सुरा खुपसला जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देण्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नकार दिला. नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
'चिकन दिलं तरच डिस्चार्ज घेईल, नाही तर इथेच राहीन,' हट्टापुढे डॉक्टरही नमले https://t.co/v35kuw7dUm
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतानाही पवारांनी त्यांना नामोल्लेखाने टाळण्याचा प्रयत्न केल्याने उलटसुलट चर्चांना वेग आला आहे.
पटोले यांना थेट त्यांची जागाच दाखवली. या गोष्टीत मी काही पडत नाहीत. पटोलेंसारखी माणसं लहान आहेत. लहान माणसांवर मी बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्यात तर भाष्य केलं असतं, असं पवार म्हणाले. पवारांच्या या खोचक टीकेमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
300 युनिट मोफत वीज, जुनी बिलेही माफ https://t.co/EpSu3ukpPD
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आधीपासून धुसफूस आहे. कायमच आघाडीत ठिणग्या उडाल्या. शिवाय स्वबळाचा नारा देण्यावरूनही महाविकास आघाडीत तू तू मै मै आहे. मात्र, अद्यापपर्यंत आघाडीतील कोणत्याही नेत्यांनी कुणाही विरोधात वैयक्तिक नाव घेऊन टीका केली नव्हती. मात्र, दोन वर्षात पहिल्यांदाच शरद पवार यांनी थेट पटोलेंवर टीका केली आहे.
पंकजा मुंडे मोदींच्या भेटीला; संघटनात्मक पातळीवर जबाबदारी मिळण्याची शक्यता https://t.co/w7JezU7RLh
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021