नवी दिल्ली : देशात पाऊस, वीज पडून मोठे नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये वीज पडल्याने अनेकांचा मृत्यू झाला. या ठिकाणी वीज पडल्यामुळे आतापर्यंत जवळपास 68 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात वेग-वेगळ्या भागात वीज पडल्यामुळे आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये वीज पडल्यामुळे जवळपास 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
https://twitter.com/indusdotnews/status/1414510257712345089?s=19
उत्तर देशात काही राज्यांमध्ये वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यात तब्बल 68 जणांचा मृत्यू झाला आहे. यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.
या दोन्ही राज्यात काल वीजांचा कडकडाट होत मान्सूनच आगमन झालं. राजस्थानमधील अंबर किल्ल्याजवळ वीज कोसळून एकाच ठिकाणी तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 जण जखमी झाले. यात मरण पावलेले मृत सर्वजण पर्यटक आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
'चिकन दिलं तरच डिस्चार्ज घेईल, नाही तर इथेच राहीन,' हट्टापुढे डॉक्टरही नमले https://t.co/v35kuw7dUm
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
पोलीस प्रशासनानं तात्काळ धाव घेत मदतकार्य पोहचवलं, सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. मृताच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत घोषीत केलीयं. कोट्टा, धोलपूर, झालवाड येथेही वीज कोसळून जवळपास 8 जणांचे मृत्यू झालेत.
काल रविवारी उत्तर देशामध्ये प्रचंड पाऊस कोसळला. पावसासोबत विजांचा कडकडाटही होत होता. काही ठिकाणी वीज पडून नागरिक मृत्युमुखी पडले. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त म्हणजे 41 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील सर्वाधिक मृत्यू प्रयागराज येथे झाले असून या घटनांतील मृत्यू पावलेल्यांची संख्या 14 इतकी आहे.
300 युनिट मोफत वीज, जुनी बिलेही माफ https://t.co/EpSu3ukpPD
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
तसंच कानपूर देहात आणि फतेहपूर येथे प्रत्येकी पाच, कौशांबी येथे चार, फिरोजाबाद येथे 3, उन्नाव-हमीरपूर-सोनभद्र येथे प्रत्येकी दोन, तर कानपूर नगर-प्रतापगढ-हरदोई-मिर्झापूर येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याखेरीज 200 जनावरंही दगावली आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्काळ आर्थिक मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत, तसंच आर्थिक मदतही जाहीर केली आहे.
राजस्थानमध्येही वीज पडून 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात जयपूरमध्ये 11, धौलपूरमध्ये 3, कोटा येथे 4, झालावाड आणि बारां येथे 1 असे लोक दगावले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना राजस्थान सरकारतर्फे 5 लाखांच्या भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातही वीज पडून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात श्योपूर आणि ग्वाल्हेर येथे प्रत्येकी 2 तर शिवपुरी-अनुपपूर-बैतुल येथे प्रत्येकी एक जण मृत्यू झाला आहे.
'त्या' महासंकटापासून चीनच वाचवणार, मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते https://t.co/GfQQqplSWQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021