सोलापूर : माजी सहकार मंत्री, आमदार सुभाष देशमुखांना दहावी नापास, अल्पशिक्षितांच्या हाती काम नसल्याने चिंता वाटत आहे. ही भावना त्यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करुन खंत व्यक्त केली. अशासाठी काही तरी करायचं आहे. त्यामुळे त्यांनी विचार आणि सूचना मागितल्या आहेत.
300 युनिट मोफत वीज, जुनी बिलेही माफ https://t.co/EpSu3ukpPD
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
आमदार तथा लोकमंगल समूहाचे सर्वेसर्वा सुभाष देशमुख यांनी समाजमाध्यमांवर केलेली पोस्ट जशीच्या तशी. वाचा सविस्तर…आणि मांडा आपले विचार…
मी विचार करतोय की ज्यांना शिक्षणात रस नाही, रूची नाही किंवा 10 वी नापास आहेत त्यांच्या भविष्याचं काय? मी माझ्या मतदारसंघात आणि बाहेरही फिरतो तेव्हा वय वर्षे चौदा ते चाळीस वयोगटातील बेकार तरूण खूप मोठ्या संख्येने पहातो आणि मग अस्वस्थ व्हायला होतं. कारण समाजातला हा फार मोठा वर्ग बिनकामाचा, हताश निरुत्साही, नकारात्मक विचारांनी अस्वस्थ असलेला आहे. समाज, शहर पर्यायाने देश पुढं जायचा असेल तर या वर्गानेही काम केलं पाहिजे. रोजगार मिळवला पाहिजे. दरडोई किमान उत्पन्न असलं पाहिजे तरच देशाची आर्थिक स्थिती उत्तम राहिल. किमान तो ज्या घराचा सदस्य आहे ते घर तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे नाही का! यापुढं जाऊन अजून एका विषयावर तुमच्याशी संवाद साधावा वाटतो की, प्रत्येकाजवळ शिक्षण असो वा नसो पण काही स्वप्नं जरूर असतात. कुणाला व्यावसायिक व्हायचं असतं तर कुणाला कलाकार. कुणाला नौकरी करायची असते तर कुणी नौकरी देणारा आपण व्हावं असं वाटत असतं. एकंदर काय तर प्रत्येकामध्ये काही ना काही गुण त्या निसर्गानं, परमेश्वरानं दिलेले असतात. ‘निकम्मा’ म्हणून समाजाने अव्हेरलेल्या माणसाकडे पण काही चांगले गुण असतात. संधी मिळाली तर ते स्किल, ती कला बाहेर येते, असं मला वाटतं. जगताना अनेक पर्याय आपल्यासमोर येतात त्या सगळ्याच पर्यायांना पदवी, पदव्युत्तर शिक्षण लागतंच असं नाही. कधी कधी आपल्यात काय दडलय, लपलंय याचा शोध आपल्याला लागत नाही. आणि दुर्दैवानं दिवस जात असतात, आपलं आयुष्य वाढत असतं आणि आपण आपल्याला ओळखू शकत नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ना लसीकरण, ना कोरोना अहवाल
– लसीकरण आणि कोरोना अहवाल मिळत नसल्याने काम मिळत नसल्याने विडी महिला कामगार संतप्त, केला रास्ता रोको, काय म्हणतात ऐका…#surajyadigital #solapur #सोलापूर #रास्तारोको #सुराज्यडिजिटल #coronavirushttps://t.co/MBYBVIpcTO— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
आपल्यातलं पोटेन्शिअल आपल्याला सापडत नाही. कळत नाही. अर्थातच याचा परिणाम आपल्या आणि आपल्या कुटुंबावर नकळत होत असतो.
मंडळी तर मला या संवादच्या माध्यमातून तुम्हाला एक आवाहन करायचं आहे की अशा न शिकलेल्या, अल्प-स्वल्प शिकलेल्या, दहावी-बारावी नापास झालेल्यांच्या चांगल्या भविष्यासाठी काय करता येईल? त्यांच्यातल्या कलागुणांना कसं बाहेर काढता येईल. एक चांगला माणूस म्हणून आत्मविश्वासाने आणि सन्मानाने या चौदा ते चाळीस वयोगटातील लोकांना कसं जगता येईल? त्यासाठी काय केलं पाहिजे? कसं केलं पाहिजे? याविषयी मला सांगाल? तुमच्या सांगण्यानं काही मार्ग सापडेल, यांच्यासाठी काही करता येईल. आणि मोठ्या संख्येने असलेला वर्ग प्रवाहात येऊ शकेल.
प्लीज आपण आपले विचार कळवावेत म्हणजे कामाला सुरुवात करता येईल.