मुंबई : राज्यात दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पास करण्यात आहेत. दरम्यान परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी 0.05 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. वर्षभरात जे विद्यार्थी शाळेच्या संपर्कात नव्हते, अशा 1400 विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. तर 4922 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे पाहा निकाल.
दहावीचा निकाल जाहीर, खालील साईटवर पहा निकाल, सर्वात कमी निकाल नागपूरचा तर कोकण विभागाचा १०० टक्के निकाल #निकाल #10th #results #surajyadigital #दहावी #सुराज्यडिजिटल #kokan #Nagpur pic.twitter.com/dLu5sEKTIg
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
राज्य शिक्षण मंडळामार्फत दहावीसाठी लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान घेण्यात येणार होती. तथापि, कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्यात आली. परीक्षा रद्द झाल्याने अंतर्गत मूल्यांकनानुसार दहावीचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन करून निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल ऑनलाइन पाहण्याशिवाय विद्यार्थ्यांना निकाल डाउनलोड करुन प्रिंट आउट घेता येईल.
या वर्षाच्या निकालात, 27 विषयांचा निकाल 100% लागला आहे. कोकण विभागाने दहावीची परीक्षा जिंकली असून कोकण विभागाचा निकाल 100% लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये 957 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले आहेत.
मुंबईत मुसळधार पाऊस, पुढील 24 तास अलर्ट, वडाळा, कुर्ला, सायन आणि दादर परिसरात जोराचा पाऊस #rain #surajyadigital #सुराज्यडिजिटल #mumbai #मुंबई #Wadala #kurla #पाऊस pic.twitter.com/8liPoXxZey
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दहावीचा 99.95 टक्के निकाल; साइट क्रॅश, निकाल मिळेना https://t.co/u82sj5NisQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
कोरोनामुळे पहिल्यांदाच यंदा दहावीची परीक्षा न घेता निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के लागला आहे. तर यंदा एकूण 15 लाख 75 हजार 806 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 75 हजार 752 पैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर 83 हजार 962 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.
20 लाख भारतीयांचे व्हॉट्सअॅप बंद; नवीन फीचर, इंटरनेटशिवायही करता येणार चॅटिंग https://t.co/abIgZ2eV3P
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन करण्यासाठी आणि संगणक प्रणालीमध्ये त्यांची नोंदणी करण्यासाठी माध्यमिक शाळांना 23 जून ते 9 जुलै अशी मुदत देण्यात आली होती. शाळांकडून संगणक प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांचे गुण मंडळाकडे पाठविण्यात आले.
त्यानंतर मंडळाने शाळांकडून अंतर्गत गुण गोळा करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठविला. इयत्ता नववीचा अंतिम निकाल, वर्षभर दहावीचे अंतर्गत लेखी मूल्यांकन आणि दहावीचे अंतर्गत मूल्यांकन विषयनिहाय निकालासाठी वर्गीकृत केले गेले. यानंतर दहावीचा निकाल जाहीर झाला.
मोदी सरकारचा धिक्कार
सोलापूर : इंधन दरवाढीविरोधात आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आज बोंबाबोंब आंदोलन केले #fuel #Congress #surajyadigital #hike #FuelPriceHike #MLA #सुराज्यडिजिटल #modi #मोदीसरकारhttps://t.co/DamkGDAXOx— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021