मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र एससी एचएससी बोर्डाकडून पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. यंदा 99.95 टक्के निकाल लागला आहे. कोकणचा निकाल 100 टक्के आहे. तर सर्वात कमी नागपूरचा निकाल आहे. यंदा परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मार्क देण्यात आले आहेत. दुपारी 1 वाजता मुलांना http://result.mh ssc.ac.in/ या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
दहावीचा निकाल जाहीर, खालील साईटवर पहा निकाल, सर्वात कमी निकाल नागपूरचा तर कोकण विभागाचा १०० टक्के निकाल #निकाल #10th #results #surajyadigital #दहावी #सुराज्यडिजिटल #kokan #Nagpur pic.twitter.com/dLu5sEKTIg
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार होता. मात्र निकालाची वेबसाइट क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. साधारणतः 16 लाख विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. या निकालाची उत्सुकता असताना वेबसाइट क्रॅश झाली आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. त्यामुळे निकाल लागूनही तो दिसत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही वैतागून हताश झाले आहेत. त्यामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
https://twitter.com/bhaiya__03/status/1415969545324404736?s=19
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
20 लाख भारतीयांचे व्हॉट्सअॅप बंद; नवीन फीचर, इंटरनेटशिवायही करता येणार चॅटिंग https://t.co/abIgZ2eV3P
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
यंदाच्या निकालाचं विशेष महत्त्व म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. यावर्षी दहावीच्या परिक्षेसाठी एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 48 हजार 693 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. आता या परीक्षेचा निकाल लागला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर झाला आहे. बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल.
आषाढीवारी : पंढरपूर शहरात एसटी, खाजगी वाहतूक राहणार बंद, जिल्हा प्रशासनाचे आदेश जारीhttps://t.co/Cxe1n5mqOc
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले होते. या मूल्यमापनाच्या आधारे आज दहावीचा निकाल दुपारी लागला आहे. यावर्षी पहिल्यांदाच दहावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस, पुढील 24 तास अलर्ट, वडाळा, कुर्ला, सायन आणि दादर परिसरात जोराचा पाऊस #rain #surajyadigital #सुराज्यडिजिटल #mumbai #मुंबई #Wadala #kurla #पाऊस pic.twitter.com/8liPoXxZey
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
– दहावीच्या निकालाचे अपडेट्स
* सीईटीच्या परीक्षेची तारीख लवकरचं जाहीर करणार : दिनकर पाटील
* 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 12384 शाळांचा निकाल शंभर टक्के
* राज्यात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण
* दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के
* दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 99.95