सोलापूर : कधी पाच दिवसाआड ….तर कधी आठ दिवसाआड…. पाणीपुरवठा शहराला पाचवीला पुजलेला…. दररोज पाणीपुरवठा होईल, अशी आश्वासने अनेक वेळा पालिकेतील सत्ताधारी पक्षाने दिली. मात्र शहरवासीयांना दररोजचा पाणीपुरवठा हे मृगजळ ठरले. मात्र आता दररोज पाणीपुरवठा होण्याची स्वप्नपूर्तीसाठी स्मार्टसिटीमुळे शक्य झाले आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून टेंम्पो अंगावर घालून शिवसैनिकाचा खून https://t.co/cpBD5eVNQo
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
शहरातील स्मार्ट सिटी भागात दररोजचा पाणीपुरवठा केला जात असून त्याची अंमलबजावणी देखील काही भागांमध्ये चालू झाली आहे .सोळा हजार नळांना एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करून ( डी एम ए ) डिस्टन मीटर एरिया नियमानुसार 22 झोन तयार करण्यात आले. त्यापैकी 19 नंबर झोनमध्ये दररोज पाणीपुरवठाची चाचणी घेतली ही चाचणी यशस्वी झाली. इतर आठ डीएमए भागात मध्ये घेतलेली ही चाचणी यशस्वी झाल्याने या भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
‘उजनी धरण उशाला अन् कोरड घशाला’ ही म्हण सोलापूरकरांच्या बाबतीत चपखल बसते. गेली अनेक वर्ष झाली, शहराला तीन दिवसाआड तर पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज किंवा दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन अनेक वेळा सत्ताधारी तसेच प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी झालीच नाही. वितरण प्रणाली नसल्यामुळे दररोज पाणीपुरवठा करता येत नसल्याचा खुलासा प्रशासनाकडून केला जात होता. मात्र यावर स्मार्ट सिटीने मात करत दररोज पाणीपुरवठा करण्याच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल केली आहे. नव्हे तर स्मार्ट सिटी भागात दररोज पाणीपुरवठा आता केला जात आहे.
वेळापूरने धोक्याची पातळी ओलांडली, जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांची गावाकडे धाव, होम आयसोलेशन बंद करून आयसोलेशन सेंटर सुरू करा https://t.co/Zg380jeSO8
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
सोलापूर शहरवासीयांना मानसी 110 दहा लिटर , 110 प्रतिदिन या प्रमाणे पाणी दिले जाते. याच पाण्याचा योग्य नियोजन करून स्मार्ट सिटी भागात हा पाणीपुरवठा सुरू केला आहे . पाणीपुरवठ्यासाठी स्मार्ट सिटीतून 180 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 84 किलो मीटरची अंतर्गत वितरण प्रणालीची नवीन पाईपलाईन टाकली आहे .तसेच 84 किलो मीटरची ड्रेनेज लाईन टाकून पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाईन वेगवेगळ्या केले. जुने आणि सडलेल्या पाईप लाईन काढून टाकण्यात आल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या फोटोला कॅप्शन सुचवा, इंधन दरवाढीने जनता त्रस्त झाल्याचे काही छायाचित्रे #surajyadigital #FuelPriceHike #इंधनदरवाढ #सुराज्यडिजिटल #caption #images #pepole pic.twitter.com/OZWB2vAmsB
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
जुने कनेक्शन काढून नवीन पाईप लाईनवर तब्बल सोहळा हजार कनेक्शन नवीन पाईप लाईन वर जोडले गेले आहेत. तसेच पावसाळी गटार अंतर्गत युटिलिटी चे सर्व शिफ्टिंग चे काम करून हा पाणीपुरवठा चालू करण्यात सुरू केला आहे. दररोज पाणीपुरवठ्याची घेण्यात आलेली चाचणी देखील यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. ऑगस्टअखेरपासून स्मार्ट सिटी भागात विभागात दररोज एक – दीड तास पाणीपुरवठा होणार आहे.
सध्या सिव्हिल हॉस्पिटल , काडादी चाळ, रेल्वे स्टेशन परिसर , फॉरेस्ट , रामलाल चौक, चौपाड वडर गल्ली , काशीकापडी गल्ली , शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, सिद्धेश्वर पेठ , रामलाल चौक, यासह सर्व शहरातील गावठाण भागात दररोज पाणीपुरवठा सध्या केला जात आहे.
मोदी सरकारचा धिक्कार
सोलापूर : इंधन दरवाढीविरोधात आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आज बोंबाबोंब आंदोलन केले #fuel #Congress #surajyadigital #hike #FuelPriceHike #MLA #सुराज्यडिजिटल #modi #मोदीसरकारhttps://t.co/DamkGDAXOx— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
स्मार्ट सिटी भागात स्मार्ट सिटीच्या वतीने सर्वे करण्यात आला. सर्वेमध्ये सोळा हजार नळकनेक्शन आढळून आली आहेत. या नळांना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मोफत मीटर बसवले जाणार आहेत. ऑगस्टअखेर मीटर बसविण्याचे काम पूर्ण होणार आहे. मीटर ची ऑर्डर दिली असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढवळे पाटील यांनी दिली
स्मार्ट सिटी भागात दररोज पाणीपुरवठा चालू झाल्यानंतर शहराला स्काडा प्रणालीच्या माध्यमातून दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या संदर्भातली तयारी देखील स्मार्ट सिटी च्या माध्यमातून चालू आहे.
ब्रेकिंग – दहावीत किती विद्यार्थी नापास झाले ? 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के https://t.co/gx41i6AtoA
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021