सोलापूर : प्रभाग ४ व ८ मधील स्मार्ट सिटीमधील अपूर्ण रस्त्यांच्या कामाची पाहणी शनिवारी महापौर, सभागृहनेते, नगरसेवकांनी केली. गेल्या १५ दिवसांखाली सूचना करून सुद्धा कामे पूर्ण होत नाहीत, त्यामुळे आयुक्त, सीईओ यांना अल्टीमेटम देण्यासाठी शनिवारी महापौर कार्यालयामध्ये बैठक आयोजित केली होती.
पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज, सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान, गेल्यावर्षी सारखं होऊ नयेhttps://t.co/BgksDC2JJL
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 17, 2021
श्रावण महिना व पावसाळ्याच्या अनुषंगाने रखडलेली कामे पूर्ण करा व त्या भागामध्ये मुख्य बाजारपेठ असल्याने तेथील रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत, अशी तंबी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पालिका आयुक्त व स्मार्टसिटीचे सीईओ ढेंगळे – पाटील यांना दिली.
ईबिडी भागातील राहिलेली अपूर्ण कामे व व्यापारी बाजरपेठमधील रस्ते दुरुस्त करावेत, अश्या सूचना करून देखील गेली १५ दिवस झाले, कोणतेही कामे झाली नसल्याने बैठक घेण्यात आली. येत्या ८ ते १५ दिवसांमध्ये कामे पूर्ण करावीत, अश्या सूचना सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी दिल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जुन्या कामती पोलीसस्टेशनसमोर ट्रक पलटी, इतर वाहनांचे नुकसान; नवीन जागी पोलिस स्टेशन गेल्याने मोठा अनर्थ टळला https://t.co/biyjL1QBxj
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021
हिंदू धर्मातील पवित्र समजला जाणारा श्रावण महिना तोंडावर आला आहे. ६८ लिंग या ठिकाणी भाविक हे चप्पल न घालता प्रदक्षणा घालत असतात. त्यामुळे त्यामार्गावरील अर्धवट रस्ते पूर्ण करण्यात यावेत व मल्लिकार्जुन मंदिर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते त्याअनुषंगाने तेथील रस्त्याच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नगरसेवक नागेश भोगडे, अमर पुदाले, विनायक विटकर यांनी केली.
23 जणांचा मृत्यू, केंद्राकडून दोन तर राज्याकडून पाच लाखांची मदत जाहीर, हवामान विभागाकडून 18 ते 22 ॲलर्ट जारीhttps://t.co/JHnMWc1Tgd
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021
या बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी.शिवशंकर, सभागृहनेते शिवानंद पाटील, स्मार्टसीटीचे सीईओ त्रिंम्बक ढेंगळे पाटील, महिला बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक विनायक विटकर, नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, ज्ञानेश्वर कारभारी आदीजण उपस्थित होते.
टॉपटेन 10 बेस्ट सेलिंग कार, टॉप 10 कार विक्रीचे आकडे #car #topten #lemonnews #लेमनन्यूज #bestselling #carsales pic.twitter.com/wvBvNJi0r8
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021