विरवडे बु : मोहोळ तालुक्यातील कोरवली हद्दीत आज रविवारी (ता. 18 जुलै) दुपारी दीडच्या सुमारास मोहोळ ते मंद्रूप हायवेवर जाधव यांच्या वस्तीजवळ भीषण अपघात झाला. यात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. यावेळी बघ्याची खूप गर्दी झाली होती. दुर्देवाची बाब म्हणजे गंभीर जखमी व्यक्तीस घेऊन जाणा-या रुग्णवाहिकेतही बिघाड झाला. त्यामुळे रुग्णास रुग्णालयात घेऊन जाण्यास विलंब झाला.
जुन्या कामती पोलीसस्टेशनसमोर ट्रक पलटी, इतर वाहनांचे नुकसान; नवीन जागी पोलिस स्टेशन गेल्याने मोठा अनर्थ टळला https://t.co/biyjL1QBxj
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021
कामती ते कंदलगाव रोडवर मोटर सायकल क्रमांक एम.एच.१३ डी.जे. १३५४ या मोटरसायकला अज्ञात वाहनाने धडक दिली. या झालेल्या झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील चालक बळवंत लक्ष्मण वाघमोडे (रा. गावडेवाडी) हा खाली कोसळला. त्यात यास डोकीस जबर मार लागून जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकलीवर मागे बासलेला त्याचा मित्र महादेव धारु गावडे ( रा. गावडेवाडी ता. दक्षिण सोलापूर) हाही उडून खाली कोसळला. यात तो जबर मार लागून जखमी अवस्थेत रोडच्या कडेला पडला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पावसाळा आणि श्रावणाच्या तोंडावर
रखडलेली स्मार्टसिटीची कामे तात्काळ पूर्ण करा, महापौरांनी दिली तंबीhttps://t.co/SPW0tjc7FO— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021
या अपघातातील जखमीला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे नेत असताना कोरवलीजवळ रुग्णवाहिकेतून अचानक धूर येऊ लागला. त्यामुळे जखमी रुग्णास खाजगी वाहनाने तात्काळ जखमीला सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले.
23 जणांचा मृत्यू, केंद्राकडून दोन तर राज्याकडून पाच लाखांची मदत जाहीर, हवामान विभागाकडून 18 ते 22 ॲलर्ट जारीhttps://t.co/JHnMWc1Tgd
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021
मयत बळंवत वाघमोडे यास प्राथमिक आरोग्य केंद्र कामती येथे आणून शवविच्छेदन करून सदरचे मयत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्ह्यातील अज्ञात ट्रक व त्यावरील अज्ञात चालकाचा शोध कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन माने हे करीत आहेत.
पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज, सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान, गेल्यावर्षी सारखं होऊ नयेhttps://t.co/BgksDC2JJL
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 17, 2021