सोलापूर : गर्भवती महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची का नाही यावरून राज्यांमध्ये मोठा संभ्रम होता. लस दिल्यामुळे बाळाला आणि आईला कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत हेच सिद्ध झाल्याने सोलापूर महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. गर्भवती महिलासाठी व्यापक प्रमाणात लसीकरण मोहिम राबविली.
गर्भवती महिलांसाठी लसीकरण मोहिम राबवत आहेत. गर्भवती महिलांसाठी लसीकरण मोहिम घेणारी सोलापूर महानगरपालिका ही पहिली महापालिका ठरल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमेत 99 गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले.
टॉपटेन 10 बेस्ट सेलिंग कार, टॉप 10 कार विक्रीचे आकडे #car #topten #lemonnews #लेमनन्यूज #bestselling #carsales pic.twitter.com/wvBvNJi0r8
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021
कोरोना लसीकरण याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये खूप संभ्रम आहे. पण संशोधनाअंती असे लक्षात आले की गरोदरपणात कोरोना होण्यापेक्षा लस घेणे जास्त फायदेशीर आहे. त्यामुळेच नवीन आदेशानुसार गरोदरपणाच्या सर्व टप्प्यामध्ये कोरोनाची लस घेणे सुरक्षित गणले गेले आहे. यामुळे आईस किंवा बाळास कुठलाही धोका संभावत नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लसीनंतर येणाऱ्या तापासाठी paracetamol ची गोळी घेणे सुरक्षित आहे. कुठल्याही स्त्रीस काही विशेष त्रास झाल्यास लगेचच वैद्यकीय सल्ला दिला जातो.
पावसाळा आणि श्रावणाच्या तोंडावर
रखडलेली स्मार्टसिटीची कामे तात्काळ पूर्ण करा, महापौरांनी दिली तंबीhttps://t.co/SPW0tjc7FO— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021
सोलापूर महानगर पालिकेने 17 जुलै रोजी गर्भवती स्त्रियांच्या लसीकरणाचा शुभारंभ केला. हा उपक्रम राबवणारी सोलापूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. या स्तुत्य उपक्रमाचे इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूर स्त्रीरोग संघटना, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विशेष कौतुक केले.
जुन्या कामती पोलीसस्टेशनसमोर ट्रक पलटी, इतर वाहनांचे नुकसान; नवीन जागी पोलिस स्टेशन गेल्याने मोठा अनर्थ टळला https://t.co/biyjL1QBxj
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021
ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्यअधिकारी डॉ. अरुंधती हराळकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा, सोलापूर स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. अबोली वेलणकर, सचिवा डॉ. प्राजक्ता शितोळे, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सचिवा, डॉ. तन्वंगी जोग, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याणी काळे, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूर : कोरवली गावाजवळ अपघात; एक ठार, एकजखमी…त्यात जखमीस निवून जाणा-या रुग्णवाहिकेतही बिघाड
https://t.co/NT8C9EOOTQ— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021