सोलापूर : सोलापूर रेस्टहाऊसवर वानकर-काळजे गटात एकमेकांविरोधात रेस्टहाऊसवर घोषणाबाजी झाल्याने गोंधळ उडाला. सोलापुरात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला वानकर-काळजे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केल्याने युवा सेनेची आजची बैठक रद्द झाली.
हा प्रकार आज शनिवारी (ता.24 जुलै) दुपारी शासकीय विश्रामगृहावर घडला. सोलापुरात युवासेनेच्या पदाधिकारी बैठकीचे आयोजन शासकीय विश्रामगृहावर करण्यात आले होते. सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर व शहर दक्षिण या भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला युवा सेनेचे जिल्हा निरीक्षक विपुल पिंगळे हे मार्गदर्शन करणार होते.
सोलापूर : युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ, युवा सेनेची आजची बैठक झाली रद्द #युवासेना #सोलापूर #solapur #surajyadigital #घोषणाबाजी #सुराज्यडिजिटल #बैठक #meetinghttps://t.co/hoiQZJJDUI
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 24, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या बैठकीसाठी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्यासह शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांची उपस्थिती होती. मात्र बैठक सुरू होण्यापूर्वीच एका बाजूला विठ्ठल वानकर यांचे कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजूला मनिष काळजे यांचे कार्यकर्ते थांबले होते. वानकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ‘मनीष काळजे हटाव, युवासेना बचाव…, मनीष काळजे यांचा धिक्कार असो ‘ , अशा घोषणाबाजी तसेच फलक घेऊन वानकर यांचे कार्यकर्यांनी घोषणाबाजी केली.
तर दुसऱ्या बाजूला युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मनिष काळजे यांच्या कार्यकर्त्यांनी वानकरविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ‘मनीष काळजे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा एकमेकांच्या विरोधातील घोषणाबाजीने शासकीय विश्रामगृह परिसर दणाणून गेले.
शेवटी युवा सेना निरीक्षक विपुल पिंगळे यांनी बैठक रद्द केल्याचे सांगितले. याच वेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे हे सुद्धा त्या ठिकाणी गेले. मात्र दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकाच्या विरोधात घोषणाबाजी ऐकून त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, यावरून शिवसेनेतील गटबाजी हे चव्हाट्यावर आल्याचं दिसून आले.