पुणे : आयएससीई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल लागले आहेत. या परीक्षेत काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांचा मुलगा पुष्कराज याने 98.33 टक्के गुण मिळवले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुष्कराज याचं अभिनंदन करत एक भावनिक ट्विट केलं आहे. आज राजीव सातव असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं. पुष्कराज, खूप मोठा हो ! आम्हा सर्वांना तुझा अभिमान. राजीव सातव यांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाल
आयएससीई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल काल शनिवारी जाहीर करण्यात आले. या परीक्षेत काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव सातव यांच्या मुलाने घवघवीत यश मिळवले आहे. राजीव सातव यांचा मुलगा पुष्कराज याने दहावीच्या परीक्षेत 98.33 गुण मिळवले आहेत. पुष्कराज याने मिळवलेल्या या यशामुळे त्याच्यावर राजकीय व्यक्तींकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
राजीव सातव आज असते तर त्यांना आपल्या मुलाचं यश पाहून खुप आनंद झाला असता. राजीव आणि प्रज्ञा यांचा मुलगा पुष्कराज याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत (ICSE) 98.33 टक्के गुण मिळविले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन.
पुष्कराज, खुप मोठा हो ! आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटतो, असे शुभेच्छा देत आहेत.
राजीव सातव यांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. अगदी लहान वयातच पुष्कराज याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवे आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यंदा पुष्कराजचा दहावी निकाल लागला, त्याने उत्कृष्ट गुण घेत प्राविण्य मिळवलं. पण, दुर्दैवाने लेकाच्या दहावीच्या निकालाचे सेलिब्रेशन करण्याची राजीव सातव आपल्यात नाहीत. नियतीने मोठा आघात सातव कुटुंबीय आणि पुष्कराज यांच्यावर केला आहे. मात्र, पुष्कराजच्या या प्राविण्याचं सोशल मीडियातून कौतुक होत आहे.
युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्विट करुन पुष्कराजचं अभिनंदन केलं आहे. तसेच, सर्वच स्तरावर तुला घवघवीत यश मिळो, अशी प्रार्थनाही सत्यजीत तांबे यांनी केली आहे. पुष्कराज सध्या पुण्यातील बिशॉप स्कुलचा विद्यार्थी आहे. आता, पुढे अकरावीला तो कोठे प्रवेश घेणार हे अद्याप माहिती नाही.
सुप्रिया सुळे यांनीही त्यावेळी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली होती. आपल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं, काँग्रेसचे खासदार आणि आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झालं. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दु:खद बातमी आहे. त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते.
राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा शोकभावना खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या निधनानंतर व्यक्त केल्या होत्या.