नवी दिल्ली : भारत सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली आहे. आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी लस घेतली आहे. अशातच AIIMS चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी लसीकरणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘भविष्यात कोरोना व्हायरसचे अनेक म्युटेशन समोर येतील, अशा परिस्थितीत भारतीयांना कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससोबतच बुस्टर डोसचीही गरज आहे’ असं गुलेरिया म्हणाले.
देशात कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट समोर येत आहेत, या पार्श्वभूमीवर आपल्याला बुस्टर डोसची गरज आहे, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे. देशात कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट समोर येत आहेत, या पार्श्वभूमीवर आपल्याला बुस्टर डोसची गरज आहे, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे. डॉ. गुलेरिया पुढे बोलताना म्हणाले की, “भविष्यात कोरोना व्हायरसचे अनेक म्युटेशन समोर येतील, अशा परिस्थितीत भारतीयांना कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससोबतच बूस्टर डोसचीही गरज आहे.”
एम्सच्या प्रमुखांनी म्हटलं की, सेकेंड जनरेशनची लस इम्युनिटीसाठी उत्तम ठरेल. कारण नवनव्या व्हेरियंटवर ही लस प्रभावी ठरेल. ते म्हणाले की, वॅक्सीनच्या बूस्टर डोसचं ट्रायल सुरु झालं आहे. देशातील लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस देऊन झाल्यानंतर सर्वांना बूस्टर डोस देण्याच्या मोहीमेला सुरुवात करावी लागेल.
डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले की, भविष्यात आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची संकेत मिळत आहेत. त्यामुळे आपल्याला आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोनाच्या बुस्टर डोसची गरज असेल. सध्या उपलब्ध असलेली सेकेंड जनरेशनची व्हॅक्सीन कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटवरही परिणाम दाखवत आहे. पण, भविष्यात काय परिस्थिती येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे तेव्हा या बुस्टर डोसची गरज पडेल. सध्या बुस्टर डोसवर काम सुरू आहे. देशातील सर्वांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर हा बुस्टर डोस दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
भारतात लहान मुलांच्या लसीकरणाला सप्टेंबरपासून सुरुवात होऊ शकते. एआयआयएमएसचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, “कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम महत्त्वाचं पाऊल ठरु शकते. गुलेरिया यांनी सांगितलं की, माझ्या माहितीप्रमाणे जायडल कॅडिलाने ट्रायल केली आहे आणि सध्या ते अपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहेत. भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनची ट्रायलही लहान मुलांवर ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकते. दुसरीकडे फायझरच्या लसीला अमेरिकेच्या नियमांप्रमाणे आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की, सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्याही लसीकरण मोहीमेला सुरुवात होऊ शकते.
“भविष्यात कोरोना व्हायरसचे अनेक म्युटेशन समोर येतील, अशा परिस्थितीत भारतीयांना कोरोना लसीच्या दुसऱ्या डोससोबतच बूस्टर डोसचीही गरज आहे.”
– डॉ. रणदीप गुलेरिया