टोकियो : ऑलिम्पिकमधून भारतासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. अखेर भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे. अ गटात आज ग्रेट ब्रिटनने शेवटच्या सामन्यात आयर्लंडचा 2-0 अशा फरकाने पराभव केला. त्यामुळे भारतीय महिला हॉकी संघ अ गटात चौथ्या स्थानी राहिला. त्यामुळे भारताला आता उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळता येणार आहे.
* चक दे इंडिया !
ऑलिम्पिकमधून भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. भारतीय महिला हॉकी संघाने सलग दुसरा विजय मिळवला आहे. भारताने आज दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचा पराभव केला. भारताने 4 गोल केले. तर आफ्रिकेला 3 गोल करता आले. अ गटात भारतीय महिला संघ गेल्या 2 सामन्यांपासून आक्रमक खेळ करताना दिसत आहे. दरम्यान भारतीय पुरुष हॉकी संघाने काल शुक्रवारी जपानचा पराभव केला.
टोकियो ऑलिपिक्स 2020 च्या नवव्या दिवशी (31 जुलै) भारतासाठी आनंदाची बातमी येत आहे. महिला हॉकी स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पूल एमधील सामना पार पडला. हा सामना भारतीय महिला हॉकी संघाने 4-3 ने जिंकला होता. यावेळी भारताच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. ती शक्यता आता सत्यात उतरली आहे. भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.
झाले असे की, आज शनिवारी (31 जुलै) महिला हॉकी स्पर्धेचा पूल एमधील शेवटचा सामना ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंड महिला संघात झाला. या सामन्यात ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला 2-0 ने धूळ चारली. यानंतर भारतीय महिला हॉकी संघाने अव्वल चारमधील आपले स्थान सुरक्षित केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी पात्र ठरला आहे. भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्यपूर्व सामना सोमवारी (2ऑगस्ट) ऑस्ट्रेलिया महिला हॉकी संघाविरुद्ध होणार आहे.
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान भारताकडून वंदना कटारियाने आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला. या सामन्यात वंदनाने कमालीचे प्रदर्शन केले. तिने सलग चौथ्या, 17 व्या आणि 49 व्या मिनिटाला तीन गोल केले. यासह वंदना ही ऑलिंपिकमध्ये हॅट्रिक गोल करणारी भारताची पहिली महिला हॉकी खेळाडू बनली.
भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात पहिल्या क्वॉर्टरमध्ये 1-1 असा स्कोर होता. सामन्यात चौथ्या मिनिटाला वंदना कटारियाने पहिला गोल करत भारतीय महिलांना आघाडी मिळवून दिली. त्यानंतर काही वेळातच आफ्रीका संघानेही गोल करत बरोबरी साधली. दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये देखील तसेच घडले. आधी भारतीय महिलांनी गोल केल्यानंतर पुन्हा आफ्रिकेच्या महिलांनी पलटवार करत 2-2 असा स्कोर केला. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघानी पुन्हा एक-एक गोल केला. ज्यामुळे दोन्ही संघ 3-3 अशा स्कोरवर होते. ज्यानंतर शेवटचा आणि चौथा असा निर्णायक क्वॉर्टर सुरु झाला. ज्यात पुन्हा एकदा वंदना कटारियाची जादू चालली आणि तिने एक अप्रतिम गोल करत भारताला 4-3 ची आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर आफ्रिका संघाला एकही गोल करता न आल्याने भारतीय महिला विजयी झाल्या.