सोलापूर : साेलापूर शहरात जून आणि जुलै महिन्यात काेराेना नियंत्रणात आहे. व्यापारी व दुकानदार काेराेना नियमांचे पालन करीत आहेत. सायंकाळी 4 नंतर शहरातील दुकाने बंद असतात. साेलापूर शहराचा जुलै महिन्यातील पाॅझीटिव्ही रेट एक टक्क्यांपेक्षा खाली आहे. ऑक्सीजन बेडची टक्केवारी सहा टक्के आहे. त्यामुळे साेलापूर शहरातील व्यापारपेठ सुरू करण्याची आवश्यकता आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी साेलापूर महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली हाेती. त्यामुळे जून महिन्यात बाजारपेठ सुरू झाली हाेती. आता मात्र स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिलेली नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक पदाधिकारी व्यापारी यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे निवेदन देऊन लाॅकडाऊन शिथिल करण्यात यावे अशी मागणी केली होती. पालकमंत्री यांनी गोरगरीब कामगार यंत्रमाग उद्योग व व्यापाराचे माझे शहर आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले व त्याचा पाठपुरावा केला.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे. आजच निर्णय होणे अपेक्षित होता. परंतू मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर असल्याने प्रस्तावावर सही होऊ शकली नाही.
परंतू पालकमंत्री यासाठी पाठपुरावा करीत असून येत्या दोन दिवसांत सोलापूर शहराला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता देऊन पुण्याप्रमाणेच शिथिलता देणार असे माध्यमांना सांगितले.