वेळापूर : तांदुळवाडी येथील स्वातंत्र्य सैनिक देवई संपत्ती चव्हाण (वय ९१ वर्ष) यांचे आज बुधवारी (११ ऑगस्ट) रोजी दुपारी एक वाजता निधन झाले.
त्या कै. स्वातंत्र्य सैनिक संपत्ती विठोबा चव्हाण यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात सहा विवाहित मुले, मुली व नातवंडे तसेच परतुंडे असा परिवार आहे. स्वा. संपत्ती विठोबा चव्हाण हे आझाद हिंद सेनेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अंगरक्षक होते.
१९७२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ताम्रपट देवून तर महाराष्ट्र शासनातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडून सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले होते. त्यांना जपान, आफ्रिका देशाकडून वॉर मेडल तसेच विविध पदकानी सन्मानित केले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासमवेत विविध २१ देशात आझाद हिंद सेना व फॉरवर्ड ब्लॉक संघटने तर्फे देश सेवा केली. अशा या थोर महापुरुषाच्या त्या पत्नी होत.