मुंबई : बऱ्याच दिवसापासून दडी मारलेला पाऊस आज पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे घाट भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पावसाळ्याचे दोन महिने उलटल्यानंतरही उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सहा जिल्ह्यात पाऊस नाही. राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या जवळपास पावसाची नोंद झाली असून मराठवाड्यातील जालना, परभणी आणि बीडसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील दहा जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
आज नागपंचमी दिवशी शुक्रवारी (ता. १३) मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे घाट भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मागील दहा दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाने दडी मारली होती. मात्र, आजपासून मुंबईसह उपनगरात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनगरात दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळू शकतो.
तर काही भागात प्रतितास ४० ते ६० किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १० जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाच्या दमदार सरी बरसल्या. त्यात मुंबई शहर आणि उपनगरांसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, बीड, जालना आणि परभणी या जिल्ह्यामध्ये तेथील पावसाच्या सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के जास्त पाऊस पडला.
राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. मंगळवारपर्यंत (ता. १७) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.