नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट लॉक करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी ट्विटरवर गंभीर आरोप केला आहे. ‘आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही, मीडियावर नियंत्रण आहे, मला ट्विटरकडून अपेक्षा होती, मात्र तेही पक्षपाती आहेत, लोकशाहीवर हा हल्ला आहे,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरवर टीका केली असून ट्विटर कंपनी देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करत असून सरकार सांगेल त्या प्रमाणे वागत आहे असं त्यांनी म्हंटलयं.ट्विटरने माझ्यासह काँग्रेस नेत्यांनी खाती तात्पुरती बंद केली असं करुन कंपनीने राजकीय प्रक्रीयेत हस्तक्षेप केला. हा देशाच्या लोकशाहीवर हल्ला आहे. ट्विटरने केलेली कृती त्याच्यासाठीच वाईट परिणाम करणारी होवू शकते. ट्विटर हे व्यासपीठ
तटस्थ नसून वस्तुनिष्ठ, पक्षपाती व्यासपीठ झालंय. ते सध्याच्या सरकारचच ऐकत असल्याचे म्हटलंय.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट 9 वर्षांच्या मुलीच्या आई-वडिलांसोबत झालेल्या भेटीचे छायाचित्र शेअर करण्यासाठी लॉक करण्यात आले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर अनेक पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांचे ट्विटर खाते बंद केल्याचा निषेध म्हणून त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या प्रोफाईल पिक्चरमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षाचे छायाचित्र लावले.
पक्षाने म्हटले की, “बलात्कार पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवणे हा जर गुन्हा असेल, तर आम्ही हा गुन्हा 100 वेळा करू.” जय हिंद, सत्यमेव जयते. ” काँग्रेसचे सोशल मीडिया विभागाचे प्रमुख रोहन गुप्ता म्हणाले की, पक्षाचे अधिकृत ट्विटर खाते आणि काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची सुमारे 5000 खाती ब्लॉक करण्यात आली आहेत. ट्विटर सरकारच्या दबावाखाली काँग्रेस नेत्यांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आरोप केला की, ट्विटर लोकशाहीचा गळा घोटण्यात येतंय, भारतातील भाजप सरकारला पाठिंबा देत आहे. सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, ‘खरा मुद्दा देशाच्या राजधानीत 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि जबरदस्तीने अंत्यसंस्काराचा आहे. खरा मुद्दा हा आहे की दिल्ली पोलिसांनी 15 तास FIR नोंदवण्यास नकार दिला. या निष्पाप मुलीवर झालेल्या गुन्ह्याबद्दल एक शब्द का निघाला नाही?