मुंबई : भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेक कंपन्या, बँका ग्राहकांना विशेष सूट देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असतात. असंच एका मोठ्या बँकेने होमलोनवर विशेष सूट दिली जात आहे.
ती बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया होय. ग्राहकांना घराच्या भाड्याच्या कटकटीतून स्वातंत्र्य देण्याचा बँकेचा हेतू आहे. गृह कर्जावर शून्य प्रक्रिया शुल्कची ऑफर देत आहे. एसबीआयने एका ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. एसबीआयने ट्विटमध्ये लिहिले, ‘ या स्वातंत्र्य दिनी तुमच्या स्वप्नांच्या घरात पाऊल टाका, आता शून्य प्रोसेसिंग फीसह होम लोनसाठी अर्ज करा. या व्यतिरिक्त देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयकडून महिलांना गृहकर्जावर अतिशय आकर्षक सवलत सुविधेचा लाभ दिला जात आहे. गृहकर्ज सुविधेंतर्गत महिलांना व्याजदरात 5 बेसिस पॉइंटच्या सूटचा लाभ दिला जात आहे.
बँकेच्या ग्राहकाने कर्ज घेताना कोणत्या प्रकारच्या अडचणी येत आहेत हे सांगितले. बँक कोणत्या आधारावर कर्ज देत नाही, यानंतर एसबीआयने ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच कर्ज मंजुरी अनेक घटकांवर अवलंबून असते, ज्यात उत्पन्न, माल तारण, चालू कर्ज, क्रेडिट इतिहास, व्यवहार्यता इत्यादींचा समावेश आहे. या गोष्टींची काळजी घेतली जाते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याच वेळी जर तुम्हाला एसबीआयच्या योनो सेवेअंतर्गत गृहकर्ज घ्यायचे असेल, तरीही तुम्हाला 5 बीपीएस व्याज सवलतीचा लाभ मिळेल. एसबीआय होम लोन व्याजदर 6.70 टक्के आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना 6.70 टक्के व्याजदराने 30 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज देत आहे. 30 लाख ते 75 लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर 6.95 टक्के व्याजदर असेल. 75 लाखांवरील गृहकर्जावरील व्याजदर फक्त 7.05 टक्के असेल.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोहिमेअंतर्गत एसबीआयच्या या आकर्षक गृहकर्जाची सुविधा 15 ऑगस्टला मिळू शकते. एसबीआयची डिजिटल सेवा योनो एसबीआयद्वारे गृहकर्जासाठी अर्ज करता येतो. याशिवाय एसबीआयने 7208933140 हा क्रमांक जारी केलाय. गृहकर्जासाठी व्यक्ती या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकतात.