मुंबई : आज वर्ल्ड फोटोग्राफी डे आहे. 18 ऑगस्ट 1939 रोजी फ्रेंच सरकारने फोटोग्राफीचे पेटंट विकत घेतले आणि 19 ऑगस्टपासून वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्यात आला. जोसेफ निकफेर निएपेस यांनी पहिला फोटो काढल्याचे सांगितले जाते. संपूर्ण जगभरात फोटोग्राफीला प्रोत्साहन मिळावे, तसेच जगातील विविधता फोटोच्या माध्यमातून समोर यावी हा या दिनाचे उद्देश आहे.
हा दिवस साजरा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जगभरातील फोटोग्राफर्सला चांगले फोटो काढण्यासाठी प्रोत्साहित करणं, सोबतच त्यांनी काढलेल्या खास फोटोंना जगभरातील फोटो प्रेमींच्या समक्ष प्रस्तुत करणं.
वर्ल्ड फोटोग्राफी डे वेबसाइटनुसार यंदा #WorldPhotographyDay चे 10 लाख टॅग्स बनवण्याची योजना आहे. आयोजकांचं म्हणणं आहे की या हॅशटॅगसह जास्तीत जास्त फोटो शेअर करा. कोरोना काळात सेलिब्रेट होणार हा दुसरा जागतिक फोटोग्राफी दिन आहे. यामुळं यंदाची थीम Pandemic lockdown through the lens म्हणजेच लेंसच्या माध्यमातून महामारीचं लॉकडाऊन अशी आहे.
आज ‘वर्ल्ड फोटोग्राफी डे’ आहे. इन्स्टाग्रामवर एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो कोंबडीच्या अंड्याचा आहे. या तपकिरी रंगातील अंड्यावर एकही डाग नाही. या फोटोला 55 मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. हा फोटो World_record_egg द्वारे शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देत लिहिले, चला एकत्रितपणे एक वर्ल्ड रेकॉर्ड करुया आणि इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लाईक्स केलेल्या पोस्ट मिळवूया.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
छायाचित्रकार आपले कॅमेरे बाहेर काढून फोटो काढण्यासाठी सरसावतात. तेच फोटो इंस्टाग्रामवर टाकून लाईस्क आणि कमेंटस् मिळवण्याची स्पर्धा सुरू होते. या गेममध्ये तुम्ही कोणाशी स्पर्धा करत आहात हे तुम्हाला माहिती आहे का? हे एक अंडे आहे. होय, एक कोंबडीचे अंडे. तपकिरी रंगांतील अंडी, त्यावर एकही डाग नाहीयेय. या अंड्याने इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाईक्स आणि कमेंट मिळवल्या आहेत.
अंड्यांच्या या फोटोने काइली जेनर, लिओनेल मेस्सी, एरियाना ग्रांडे आणि बिली इलिश सारख्या सेलिब्रिटींना मागे टाकले आहे. हा रिकार्ड आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही. अंड्याचा फोटो पहिल्यांदा इन्स्टाग्राम हँडलद्वारा World_record_egg द्वारे शेअर केली गेली. त्यात कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे: “चला एकत्रितपणे एक वर्ड रेकार्ड करुया आणि इंस्टाग्रामवर सर्वाधिक लाईक्स केलेल्या पोस्ट मिळवूया. कायली जेनरने (18 मिलियन) वर्ड रेकार्ड मोडला आहे “आज या फोटोला 55 मिलियनहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
या अंड्यानंतर सध्या सर्वाधिक लाइक्स मिळालेल्या इन्स्टाग्राम फोटोंच्या लिस्टमध्ये एरियाना ग्रांडे सर्वात पुढे आहे. तिने केलेल्या डाल्टन गोमेझसोबतच्या लग्नातील फोटोंच्या अल्बमला आतापर्यंत 26.7 मिलियन लाइक्स मिळाले आहेत. सेलिब्रिटी बिली इलीश आणि स्पोर्ट्स स्टार लिओनेल मेस्सी देखील टॉप 10 च्या यादीत आहेत. परंतु, अंड्याने प्रस्थापित केलेल्या वर्ड रेकार्डपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे.