नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरण सुरू आहे. आता १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस मिळणार आहे. मुलांना झायडस कॅडिला ही लस देण्यात येणार आहे. भारतात १२ ते १७ वयोगटातील सुमारे १२ कोटी मुले आहेत, त्यापैकी १ टक्क्यांपेक्षा कमी मुलांना आरोग्य समस्या असू शकतात असा अंदाज आहे. अशी माहिती NTAGI चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी दिली.
देशातील कोरोना लसीकरण मोहिमेला आता आणखी वेग येणार आहे. कारण, देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना आता लवकरच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस देण्यात येणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना ही लस दिली जाईल. डीसीजीआयकडून यासाठीची परवानगी मिळली असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना झायडस कॅडिला ही लस देण्यात येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत माहिती देताना केंद्र सरकारच्या कोविड१९ वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले कि, देशात १२ ते १७ वयोगटातील सुमारे १२ कोटी मुले आहेत, त्यापैकी १ टक्क्यांपेक्षा कमी मुलांना आरोग्य समस्या असू शकतात, असा अंदाज असल्यामुळे या वयोगटातील मुलांना गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंत किंवा विषाणूमुळे मृत्यू होण्याच शक्यता नाही.
उलट, त्यांच्या पालकांमध्ये १० ते १५ पटीने आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याची शक्यता असून शकते, जे साधारणतः १८ ते ४५ वयोगटातील आहेत. म्हणूनच, आम्ही मुलांना लसीकरण सुरू करण्यापूर्वी या (१८ ते ४५) गटाचे लसीकरण करण्यास प्राध्यान्य देत असल्याचे सांगितले.
राज्य सरकारांना बौद्धिक विकासासाठी प्राथमिक शाळा लवकर उघडण्याची सूचना आहे. १२ ते १७ वयोगटातील मुलांना गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार केली जाईल. जेणेकरून त्यानंतर लसीचे प्राधान्य ठरवले जाईल, असंही एन के अरोरा यांनी सांगितलं आहे.