सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संतोष धोत्रे यांची साताराहून बदली झाली आहे. तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांची नाशीक येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाले नंतर त्यांचे रिक्त पदावर संतोष धोत्रे यांची बदली झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री संतोष धोत्रे यांनी प्रभावी पणे काम केले आहे. अॅग्रीकल्चरल मध्ये पदवीधर असलेले संतोष धोत्रे यांनी २००१ व २००२ मध्ये महसूल विभागामध्ये काम केले आहे.
नाशीक व नगर येथे परिविक्षाधिन अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर सोलापूर, धुळे व सिंधूदुर्ग येथे त्यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले. तत्कालीन पर्यावरण मंत्री यांचे ते खाजगी सचिव म्हणून मंत्रालयात काम केले आहे. सन २०१५ मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती मिळाले नंतर जालना येथे ३ वर्षे व त्या नंतर सातारा येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर येथील कामाचा त्यांना दिर्घ अनुभव आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. किटकनाशके व फळांवरील अवशेष परिणाम यावर त्यांनी शोधनिबंध लिहिला आहे. २००३-४ मध्ये मगर जिल्हयात काम करीत असताना पाथर्डी येथील पाणी टंचाई आराखडा व त्यांची अंमलबजावणी हा पथदर्शी प्रकल्प ठरला.
राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने राज्यातील ३४ गटविकास अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या गुरुवारी केल्या आहेत. त्यात पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार यांची अहमनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गोरख शेलार हे मागील आठ महिन्यांपूर्वी पाणी व स्वच्छता विभागात नियुक्ती झाली होती, केवळ आठ महिन्यात त्यांची बदली झाली, त्यांनी विनंती बदली घेतली असल्याचे समजले. स्मिता पाटील या माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी होत्या. त्या आता मुख्यालयात पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.