अक्कलकोट : तालुक्यातील काझीकणबस येथे शेतीच्या बांधाच्या वादातून महिलेवर तोक्षण हत्याराने वार करून ठार मारून मृतदेह तलावात टाकल्याप्रकरणी अञ्चलको उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता सिद्धाराम देशेट्टी ( ४५) असे मृत महिलेचे नाव आहे.
रविवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजता शिवारातील तलावाजवळ ही घटना उघडकीस आली. यात पोलिसांनी संशयित आरोपी दीर शांतप्पा बसवणप्पा देशेट्टी (रा.काझीकणबस) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, यातील शांतप्पा आणि संगीता हे दोघे नात्याने चुलते पुतणे असून, काझीकणबस शिवारात पाण्याच्या तलावाजवळ त्यांची शेती आहे. दोघांच्या शेतीत सामाईक बांध आहे. ही बांध देशट्टीने वारंवार फोडल्याचे कारणावरून यापूर्वी तक्रार झाली होती. त्यावेळी देशेट्टीने संगीताला बघून घेतो, अशी धमकी दिली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या सामाईक बांधावरून त्यांच्यात वाद झाला आणि संगीताच्या गळ्यावर, मानेवर, उजव्या हाताचे दंडावर धारधार हत्याराने वार करून जीवे मारले. त्यानंतर, तिला तलावात टाकून दिल्याची फिर्यादी खंडेशा सिद्धाराम देशेट्टी (वय २१) मयताच्या मुलाने दिली आहे.
काझीकणबस या गावात मयत महिला व दौर शांतणा बसवणप्पा शेट्टी यांची शेतजमीन असून सामायिक बांध शांतप्पा हे सतत अतिक्रमण करत होते. मागील दहा महिन्यांपूर्वी या विषयावरून भांडण ही झाले असे समजले. पण शेतातून घरी परत न आल्याने फिर्यादी मुलगा खंडेशा यांनी आपल्या आईचा सर्वत्र शोध घेतला पण सापडून आली नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी आईला शोधत असताना मुलगा खंडेशाला शेताजवळील तलावाच्या पाण्यात एक महिला पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले. त्यामुळे मुलगा खडेशा आपल्या चुलत भावाला व मोठे चुलते यांना सोबत घेऊन खात्री केली असता मयत संगीता सिद्धाराम देशेट्टी आढळून आल्या.
पाण्यातून प्रेत बाहेर काढले असता मयत संगीताच्या गळ्यावर, मानेवर उजव्या हाताच्या दंडावर धारदार हत्याराने मोठ्या जखमा दिसल्या. ही हत्या फिर्यादीचे चुलते संशयित शांतप्पा बसवणम्पा देशेट्टी यांनी केली आहे, असे फिर्यादी खडेशा सिद्धाराम देशेट्टी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. संशयित आरोपी शांतप्पा देशेट्टी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत.