सोलापूर : खेळत असताना घराशेजारी पावसाच्या पाण्याने तुंबलेल्या खड्ड्यात पडून सहा वर्षांचा बालक दगावला. ही दुर्घटना टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे काल सोमवारी (ता. ६) सायंकाळच्या सुमारास घडली.
श्रेयस बिरप्पा उडगी (वय ६ वर्षे, रा टाकळी) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. तो सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घराजवळ खेळत होता. त्यावेळी शेजारच्यांनी खोदलेल्या खड्ड्यात पाय घसरून पाण्यात पडला. या घटनेची नोंद मंद्रूप पोलिसात झाली. हवालदार असादे पुढील तपास करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी ब्रिज येथील ग्रामपंचायतीसमोर असलेल्या अनिल देवानंद लाड यांनी शौचालय बांधकाम करण्यासाठी मारलेल्या खड्ड्याने या चिमुकल्याचा जीव घेतला आहे. शौचालय बांधकाम सुरू करून अनेक दिवस झाले असूनही ते अद्यापही पूर्ण न केल्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तो खड्डा पूर्ण पाण्याने भरले आहे. त्यात पाण्याचा अंदाज न लागल्याने श्रेयश त्या चार फूट खड्ड्यात पडला. श्रेयशने जीव गमवला.
शौचालय खड्डा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीने दोन वेळा नोटीस बजावली असून देखील त्याकडे दुर्लक्ष करून सदर बांधकाम अर्धवट सोडून दिल्याने हा प्रसंग ओढवला असल्याचे गावक-याचे म्हणणे आहे. अनिल लाड यांच्या हलगर्जीपणामुळे शौचालय बांधकाम अनेक महिने अपूर्ण ठेवल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी टाकळी येथील नागरिकांमधून होत आहे.
“ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही जेसीबीच्या साहाय्याने शौचालय खड्डा बुजवण्यासाठी गेले असता लाड कुटुंबानी आम्ही नंतर बुजवून घेतो म्हणून जेसीबी परत पाठवून दिले आहे. त्यांना खड्डा बुजवण्यासाठी कायदेशीर नोटीस देखील बजावली आहे”
अमोगसिद्ध माळगोंडे – ग्रामसेवक
* उंबरेपागे येथे दोन गटात कुऱ्हाड, दगडाने मारहाण, महिलेसह चौघे जखमी