सोलापूर : येथील मड्डीवस्ती जुना तुळजापूर नाका परिसरात अनैतिक संबधातून एकाचा खून झाला. ही घटना काल मंगळवारी ( 7 सप्टेंबर) रोजी घडली. तसेच दुस-या घटनेत पत्नीने दारूड्या पतीला स्क्रु ड्रायव्हर मारल्याने मृत्यू झाला आहे.
नामदेव गजानन चौगुले (वय 40, रा. मड्डीवस्ती शांती नगर सोलापूर) असे मृताचे नाव आहे. मयत हा घरात घुसून पत्नीची छेडछाड करतो आणि पत्नीने तक्रार केलेली मागे घे म्हणून घरी येवून शिवीगाळ करू लागल्याने तसेच बहिणीश अनैतिक संबध ठेवले याचा राग आल्याने आरोपी शंकर गुंडप्पा लिंबोळे याने लोखंडी कुऱ्हाडीने नामदेव चौगुले याच्या अंगावर सपा सप वार करून त्याला जागीच ठार मारले, अशी फिर्याद पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलीसांनी शंकर लिंबोळे याच्या विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस निरीक्षक करणकोट करीत आहेत.
* दारूड्या पतीला स्क्रु ड्रायव्हर मारल्याने मृत्यू
सोलापूर : येथील रोहिनी नगर भाग 2 विजापूर नाका परिसरात दारू पिऊन आलेल्या पतीला पत्नीने स्क्रु ड्रायव्हरने मारल्याने त्यात जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना 29 ऑगस्ट रोजी घडली. श्रीकांत बाळासाहेब यलगोंडे (वय 29, रा. रोहिनी नगर भाग 2, शिक्षक सोसायटी देशमुख सर यांच्या घरात भाड्याने सोलापूर) असे मृताचे नाव आहे.
हा दारू पिऊन घरी आला आणि पत्नीला जोरात हाक मारली. घराच्या कट्ट्यावरच पती पडला. त्यावेळी पत्नीने घराचे दार उघडून घराच्या बाहेर कट्ट्यावर पडलेल्या पतीला घरात घेतले. त्यावेळी पती पत्नीचे केस धरून मारहाण करू लागला. त्यावेळी घरातील फ्रिज वर ठेवलेल्या स्क्रु ड्रायव्हरने पत्नीला मारहाण केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पत्नी अश्विनी हिने पतीच्या हातातील स्क्रु ड्रायव्हर काढून घेवून त्याला डोक्यात मारले, त्याचा प्रहार जोरात बसल्याने रक्तस्त्राव होऊन पती खाली पडला. पत्नी अश्विनीने पतीला जखमी अवस्थेत बाथरूम मध्ये नेवून अंघोळ घालून रक्ताने भरलेले कपडे धुवून टाकले आणि बेडरूममध्ये नेवून जखमेवर हळद लावून डोक्याला ओढणी घट्ट बांधून ब्लँकेट उशाला दिले व पांघरून घातले.
त्यानंतर अश्विनी हिने पतीच्या नातेवाईकांना फोन करून सांगितले परंतु कोणी आले नाही पुन्हा सकाळी नातेवाईकांना फोन केल्यानंतर नातेवाईक आले आणि मृताला पाहून त्यांनी पोलीसांना खबर दिली. त्यावरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सुरज दस्तगीर मुलाणी यांनी फिर्याद दिली त्यावरून पत्नी अश्विनी यलगोंडे हिच्या विरूध्द गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुलाणी करीत आहेत.
* शटर उचकटून सहा लाखाची चोरी
माळशिरस : माळशिरस येथील म्हसवड रोड कुलकर्णी वस्ती येथील सन्मती सुकुमार दोशी यांच्या घरी 7 सप्टेंबर रोजी पहाटे 11.30 ते 4 च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून 6 लाख 20 हजाराची चोरी झाली आहे.
माळशिरस पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की येथील व्यापारी सन्मती दोशी यांच्या घराचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करून कपाट उघडून 7 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने शटर उचकटून घरामध्ये प्रवेश केला. कपाट उघडून कपाटातील रोख रक्कम सोन्याचे दागिने व एक किलो ग्रॅम चांदीची भांडी असा एकूण 6 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून पोबारा केला आहे.
याबाबत सन्मती सुकुमार दोशी यांनी माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 529/2021 भादवि कलम 457 व 380 अन्वये फिर्याद दिली असून घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी भेट दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड हे करीत आहेत.