नवी दिल्ली : टीम इंडियाची कमान पुन्हा एकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या हाती आली आहे. तेही T-20 वर्ल्डकपच्या वेळी. म्हणजे टी-20 वर्ल्डकपदरम्यान त्याला टीम इंडियाचे मार्गदर्शक बनवण्यात आले आहे. म्हणजेच तो कर्णधार नसेल, पण त्याची नेतृत्व क्षमता आणि खेळाची समज टीम इंडियासाठी उपयुक्त ठरेल. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्वतः त्याला टीम इंडियाचा मार्गदर्शक बनवण्याबाबतची माहिती दिली.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आयसीसी T-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा भारताऐवजी युएई आणि ओमानमध्ये होणार आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे, भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून निवड करण्यात आली आहे. तर अतिरिक्त खेळाडू म्हणून श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर यांची निवड करण्यात आली आहे.
युएई आणि ओमानच्या मैदानात रंगणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने बुधवारी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय संघाची घोषणा केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
17 आक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत युएईच्या मैदानात वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. अपेक्षेप्रमाणे सूर्यकुमार यादव याला संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे फिरकीपटूंमध्ये अश्विनवर भरवसा दाखवण्यात आलाय. रिषभ पंतच्या जोडीला ईशान किशनला दुसरा यष्टीरक्षक म्हणून पसंती देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये रंगलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत मध्यफळीत खेळताना दिसलेल्या श्रेयस अय्यरच्या नावाचा समावेश हा स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत करण्यात आला आहे.
* T-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ जाहीर
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (VC), KL राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (wk), इशान किशन (wk), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मार्गदर्शक महेंद्रसिंह धोनी, स्टँडबाय खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर
* T-20 वर्ल्डकपमधील भारताच्या लढती
24 ऑक्टोबर पाकिस्तानविरुद्ध
31 ऑक्टोबर न्यूझीलंडविरुद्ध .
03 नोव्हेंबर- अफगाणिस्तानविरुद्ध
05 नोव्हेंबर- पात्रता संघाविरुद्ध
06 नोव्हेंबर- पात्रता संघाविरुद्ध..