लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘अब्बा ‘जान’ या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. बिहारच्या मुजफ्फरपूर येथील कोर्टात योगींविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. योगींच्या वक्तव्यामुळे मुस्लीमांच्या भावना दुखावल्या, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना ‘अब्बा जान’ म्हणणारे आधी सर्व रेशन संपवत होते, असे योगी यांनी म्हटले होते.
योगी यांनी एका विशिष्ट समाजाल उद्देशून हा शब्दप्रयोग केला असून, हा समाज नाराज झाला आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांविरुद्ध सीजेएम कोर्टात काल सोमवारी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. अहियापूर ठाणे परीक्षेत्रातील भीखनपूर गावच्या सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी दाखल केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अब्बाजान हा शब्दप्रयोग करून, एका विशिष्ट समाजाची बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. न्यायालयात सुनावणीसाठी ही याचिका घेण्यात आली असून 21 सप्टेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी कुशीनगर परिसरात एकूण १२० कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण केलं. त्यावेळी, भाषणात अब्बाजान शब्दप्रयोग करत त्यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुख्यमंत्री यांनी समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. “अब्बाजान म्हणणारे सर्वजण गरीबांचा राशन हडपायचे. कुशीनगरचा राशन तेव्हा थेट नेपाळ, बांगलादेश पर्यंत पोहोचत होतो. कुशीनगर परिसरत शेती, धर्म आणि श्रद्धा यासाठी ओळखला होता. जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघात जाणं बाकी आहे. एकूण चारशे कोटींपेक्षा अधिकच्या योजनांचं लोकार्पण करायचं आहे. हे लोकार्पण तर नुसता ट्रेलर आहे. अद्याप बरंच काही होणं बाकी आहे. भगवान बुद्ध यांना समर्पित मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी देखील जरुर येणार आह”, असे योगींनी म्हटले होते.
योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना, २०१७ पुर्वी कुशीगरमध्ये सर्वांना रेशन मिळत होतं का? असा प्रश्न केला. तसेच तेव्हा फक्त अब्बाजान म्हणणाऱ्या लोकांना रेशन मिळत होतं असं सांगितलं. त्यावर प्रतिउत्तर देत आता काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी योगींवर निशाना साधला आहे. “आपल्या सरकारला सर्व समावेशक अफगाणिस्तान पाहिजे आहे, मात्र अब्बा जानचे वक्तव्य करणाऱ्या योगींना काय पाहिजे? सर्वसमावेशक उत्तर प्रदेश की, फोडा आणि राज्य करा?” असे म्हणत सिब्बल यांनी योगींना प्रश्न केला आहे. सिब्बल यांनी ट्विट करत हे मत मांडलं आहे.