नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच आता कोरोनानंतर डेंग्यूचा देखील नवा व्हेरिएंट सापडला आहे. नवीन डेंग्यू व्हेरिएंट DENV-2 च्या ओळखीवर डॉक्टरांनी धोक्याचा इशारा दिला आहे. केरळसह 11 राज्यांमध्ये डेंग्यू तापाच्या धोकादायक व्हेरिएंटचा प्रकार आढळला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, डेंग्यू विषाणूचा व्हेरिएंट केस लोडमध्ये भर घालत आहे आणि तो पूर्णपणे प्राणघातक आहे.
कोरोनानंतर डेंग्यूनेही डोकं वर काढलं असून डेंग्यूचा नवा व्हेरिएंट सापडला आहे. नवीन डेंग्यू व्हेरिएंट DENV-2 च्या ओळखीवर डॉक्टरांनी धोक्याचा इशारा जारी केला आहे. केरळसह 11 राज्यांमध्ये डेंग्यू तापाच्या धोकादायक व्हेरिएंटचा प्रकार आढळला आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, डेंग्यू विषाणूचा व्हेरिएंट केस लोडमध्ये भर घालत आहे आणि तो पूर्णपणे प्राणघातक आहे. केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये डासांमुळे होणाऱ्या व्हायरल संसर्गाची पुष्टी झाली आहे. डेंग्यूची काही प्रकरणं साधारणपणे पावसाळ्यात नोंदवली जात असली तरी यावर्षी डासांमुळे होणाऱ्या विषाणूजन्य आजाराशी संबंधित प्रकरणांमध्ये गेल्या दीड महिन्यात मोठी वाढ झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. तापामुळे 10 दिवसांत तब्बल 53 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 186 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जवळपास 45 चिमुकल्यांनी डेंग्यूमुळे आपला जीव गमावला आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, डेंग्यूच्या वाढत्या घटनांमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोणत्याही शाळाचालकाने याकडे दुर्लक्ष केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.
अहवालानुसार, डेंग्यू विषाणू, DENV-2 किंवा D2 स्ट्रेन केवळ प्रकरणांची तीव्रता वाढवत नाही तर अधिक नुकसान देखील करतो. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे बलराम भार्गव यांनी म्हटलं की, हा स्ट्रेन विशेषतः धोकादायक आहे आणि यामुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे.
प्रामुख्याने हा डेंग्यू विषाणू आहे ज्यामुळे धोकादायक आजार होतो, तो D1, D2, D3 आणि D4 या चार रूपांमध्ये आढळून येतो. DENV संसर्गाचे प्रकार कोविड सारखे संकेत दर्शवतात. तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की, अधिक चिंताजनक डेंग्यू स्ट्रेनच्या उपस्थितीचा अर्थ असा होऊ शकतो की याचा लोकांना यापूर्वी संसर्ग झालेला आहे आणि तो पुन्हा होण्याची शक्यता आहे.