नवी दिल्ली : दिल्लीच्या एका पॉश भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रेस्टॉरंटमध्ये साडी नेसलेल्या महिलेला प्रवेश नाकारला ! का? कारण ती साडी नेसून आली होती. ती तिथे एका हॉटेल कर्मचाऱ्याला विचारते की साड्यांना परवानगी नाही का? त्यावर कर्मचारी उत्तर देते की, साडी स्मार्ट कॅज्युअल म्हणून गणली जात नाही. हॉटेल फक्त स्मार्ट कॅज्युअल्सना परवानगी देते. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हा प्रकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. साडी नेसून आलेल्या एका महिलेला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे चक्क भारतात घडल्याने आश्चर्य आणि संताप दोन्ही व्यक्त होत आहे. हा प्रकार काही दिल्लीत पहिल्यांदाच घडला नाही. गेल्या वर्षी मार्च 2020 मध्ये दिल्लीतल्या वसंत कुंज भागातील कल्याण अँड लाव्ही रेस्टॉरंटमध्येही असाची प्रकार घडला होता. साडी नेसलेल्या महिलेला या हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला होता. येथे पारंपारिक वेशभूषेतील ग्राहकांना प्रवेश नाही, ही आमची पॉलिसी आहे असं उत्तर हॉटेल चालकांनी दिलं होतं.
आता ताजा यासंबंधीचा 16 सेकंदाच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओमध्ये एक पुरुष आणि एक महिला कर्मचारी या महिलेची अडवणूक करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका लेखिकेने पोस्ट केला आहे.
Who decides sari is not ‘smart wear’? I have worn sarees at the best restaurants in the US, UAE as well in UK. No one stopped me. And some Aquila Restaurant dictates a dress code in India and decides saree is not ‘smart enough’? Bizarre. pic.twitter.com/8c6Sj1RNha
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) September 22, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या व्हिडिओमध्ये महिलेने ‘साडी नेसलेल्या महिलांना प्रवेश नाही असा नियम हॉटेलमध्ये कुठे लिहिला आला आहे का, असा सवाल केला. यावर महिला कर्मचाऱ्याने धक्कादायक उत्तर दिलं आहे. ‘आम्ही फक्त स्मार्ट कॅज्युअल कंपड्यांमध्ये असणाऱ्यांना प्रवेश देतो. साडी हा स्मार्ट कॅज्यूअल प्रकार नाही, असं या महिला कर्मचाऱ्यांनं म्हटल्याचं या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतंय.
लेखिका शेफाली वैद्य यांनी हा व्हिडिओ शेअर करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, साडी स्मार्ट वेअर नाही हे कोणी ठरवलं? मी अमेरिका , यूएई तसंच यूके मधल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून गेली आहे. तिथे मला कोणीही रोखलं नाही आणि भारतात अकिला रेस्टॉरंट साडी स्मार्ट वेअर नाही हे सांगत स्वत:चे वेगळे नियम बनवत आहे, हे आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे.
या व्हिडिओवर नेटिझन्सनेही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या हॉटेलच्या या धोरणावर टीका करताना हा वाईट प्रकार असल्याचं म्हटलं आहे. एका युझर्सने या प्रकरणावर दिलेल्या कॅप्शनमध्ये कोलोनियल कुलीज लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी एका युझर्सने लिहिलंय, ‘दुर्दैवाने रेस्टॉरंटच्या मालकांना ग्राहकांच्या प्रवेश देण्याचे अधिकार आहेत. ज्याअंतर्गत ते कोणालाही कोणतेही स्पष्टीकरण न देता प्रवेश देण्यापासून रोखू शकतात, असेही काही जणांनी मत व्यक्त केले आहे.