नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला दोन युवा नेते मिळाले आहेत. बिहारमधून आलेले कन्हैया कुमार आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी राहुल गांधींचे कौतुक करत आज काँग्रेस मध्ये प्रवेश केला. या दोन्ही नेत्यांचा उदय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भाषण देऊन झाले होता. दरम्यान, कन्हैया कुमार हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोडून पक्षाचा परंपरागत विरोधक असलेल्या काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जेएनयू विद्यार्थी संघटनेचे (जेएनयूएसयू) माजी अध्यक्ष व कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये सामील होण्यापूर्वी कन्हैया कुमारने पाटण्यातील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयातील एसी काढून घेऊन गेले. कन्हैया कुमारने बेगूसरायमधून सीपीआयच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्या काँग्रेसमध्ये सामील होण्याची चर्चा कित्येक दिवसांपासून सुरू होती.
सीपीआय नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी कन्हैया कुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती त्यानंतर कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दिल्लीमध्ये कन्हैया कुमार यांच्या स्वागताचे बॅनरदेखील लावण्यात आले आहेत. दरम्यान, काँग्रेस प्रवेशापूर्वी कन्हैया कुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) ऑफिसमध्ये लावलेला एसी काढून नेल्याचं समोर आलं आहे. सीपीआय बिहारचे सचिव राम नरेश पांडे यांनी मंगळवारी या घटनेला दुजोरा दिला. नरेश म्हणाले की, सीपीआयच्या पाटणा कार्यालयात कन्हैया कुमार यांनी स्वतःच्या पैशाने एअर कंडिशनर बसवले होते, त्यांनी ते काढून नेले आहे. यासंदर्भात एनडीटीव्हीने वृत्त दिलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रवेशाअगोदर पांडे म्हणाले की, “आम्ही त्यांना ऑफिसमधील एसी काढण्यासाठी परवानगी दिली होती. कारण, त्यांनी तो एसी स्वतःच्या पैशांनी बसवला होता. मात्र, कन्हैया कुमार त्यांचा काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय मागे घेतील, अशी आशा पांडे यांनी व्यक्त केली. पांडे म्हणाले की, कन्हैया कुमारची विचारधारा ही कम्युनिस्टांची आहे आणि असे लोक कधीही त्यांच्या विचारधारेपासून विचलित होत नाहीत.”
पांडे यांनी सांगितले की, कन्हैया कुमार ४-५ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी पक्ष सोडण्याचे कोणतेही संकेत दिले नव्हते. तसेच त्यांनी पक्षात कोणत्याही विशेष पदाची मागणी केली नव्हती. दरम्यान, जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे नेते आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.