मोहोळ : मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील १० वर्षीय लहान मुलाला अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने पळवून नेल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजनेच्या दरम्यान घडली असून या प्रकरणी मोहोळ पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील सुनिता रमेश पिसाळ या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलगी रेणुका पवार ही दोन मुलांसह आई जवळच आष्टी येथे राहते. आज बुधवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान त्यांचा दहा वर्षीय नातू सागर सुरेश पवार घरासमोर खेळत होता. सुनिता पिसाळ यांचे घरातील काम उरकून त्यांनी पुन्हा अंगणात पाहिले असता सागर दिसून आला नाही.
याबाबत आजूबाजूला तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली असता तरीही कुठे दिसून आला नाही. यावरून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून सागर याला पळवून नेल्याचा संशय असल्याची तक्रार सुनिता पिसाळ यांनी दिली असून त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण हे करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* भंगार व्यवसायिकाकडील परप्रांतीय ठेकेदाराला मारहाण
बार्शी : येथील तुळजापूर रस्त्यावर असलेल्या भंगार व्यवसायिकाकडे काम करणार्या मजूर ठेकेदाराला तू आम्हांला काम का सांगतोस, असे म्हणून दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याबाबत जखमी सुरेशसिंग विक्रमसिंग ठाकूर (मूळ रा. सेमेरी ता. जयतापुर जि. बलरामपुर राज्य उत्तर प्रदेश सध्या सुलतान स्क्रॅप मर्चंट, कदम वस्ती तुळजापूर रोड, फपाळवाडी, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मच्छिंद्र शेंडगे, अंकुश शेंडगे या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मुसा सय्यद यांचा तुळजापूर रस्त्यावर सुलतान स्क्रॅप मर्चंट या नावाने भंगार सामान गोळा करणे व विक्री करणेचा व्यवसाय आहे. या ठिकाणी सुरेशसिंग ठाकूर हा आपल्या गावाकडील दहा मुले घेवून कामास आहे. त्याच ठिकाणी हे गुन्हा दाखल झालेले दोघे कामास आहेत. दुपारी 02:30 वा.चे सुमारास ठाकूर हा गावाकडील मुलांना काम करणेबाबत बोलत असताना अंकुश शेंडगे त्यास तू सर्वांना काम का सांगतो असे म्हणून शिवीगाळी करू लागला, त्यावेळी त्याने तू शिवीगाळी करू नको, मी आमचे गावाकडील मुलांचा मुकादम आहे असे त्यास उलट सांगितले असता दोघा भावांनी मिळून त्यास मारहाण सुरु केली.
यावेळी मच्छिंद्र याने तेथेच खाली पडलेला लोखंडी पाईप उचलून डोकीत मारला. त्यामुळे डोके फुटून रक्तस्त्राव होवू लागला. त्यामुळे ते दोघे पळून गेले. इतर सहकार्यांनी ठाकूर यास दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.