सोलापूर : आजारामुळं पतीचं निधन झाल्याचा धक्का सहन न झाल्यानं पत्नीनं रेल्वेखाली स्वतःला झोपून देवून आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी सोलापुरात रेल्वे स्टेशन भैय्याचौक बोगद्याजवळ घडला आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
अनुसया अप्पासाहेब कोरे (वय ३८, रा. मल्लेवाडी, ता. मंगळवेढा) असं या विवाहितेचं नाव आहे. अप्पासाहेब कोरे यांना निमोनियाचा त्रास होवू लागल्यानं काही दिवसापूर्वी सोलापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच आज पहाटे निधन झालं. त्यांच्या आजारपणातील सेवेसाठी पत्नी अनुसया या सोलापुरात होत्या. झालेला भरमसाठ खर्च त्यात पतीच्या निधनाचं वृत्त ऐकून त्यांना धक्का बसला यातच त्यांनी सोलापूर रेल्वेस्टेशन नजीक रेल्वे रुळावर पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीखाली स्वतःला झोपून देवून आत्महत्या केली.
अनुसया यांचे सासु सासरे, दिर आधीच मृत पावले आहेत. कोरे दांपत्याला सात वर्षाचा एक मुलगा आहे, तो मात्र आता पोरका झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीसांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली.
पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे त्या विवाहितेने सोलापूर-पुणे या रेल्वे मार्गावर जाऊन रेल्वेच्या खाली आत्महत्या केली आहे. हा प्रकार आज सकाळी सोलापूरात रेल्वेस्टेशन भैय्याचौक बोगद्याजवळ घडला आहे. तर, या दापत्यांना 7 वर्षाचा मुलगा आहे. झालेला भरमसाठ खर्च आणि त्यात पतीच्या निधनाचं वृत्त ऐकून त्यांना धक्का बसला यातच त्यांनी सोलापूर रेल्वेस्टेशन नजीक रेल्वे रुळावर पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीखाली स्वतःला झोपून देवून आत्महत्या केली. अनुसया यांचे सासुसासरे, दिर आधीच मृत पावले असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मंगळवेढा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस अधिकारी प्रल्हाद चव्हाण करत आहेत.
* धुळे येथे अनोळखी वाहनाच्या धडकेने पादचारी ठार
सोलापूर – तुळजापूर मार्गावरील ऊळे गावाजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने ५०वर्षाचा अनोळखी पादचारी इसम जागीच ठार झाला. हा अपघात मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडला. मयत हा गहूवर्णीय असून त्याच्या अंगावर काळा स्वेटर आणि काळी पॅन्ट आहे. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली. संबधितांनी हेडकॉन्स्टेबल सय्यद यांच्याशी संपर्क साधावा .
* स्वतः गळ्यावर ब्लेडने वार
सोलापूर : रामवाडी परिसरातील अंबाबाई मंदिराजवळ राहणाऱ्या मुख्तार अब्दुल खान (वय ३०) या विवाहित इसमाने राहत्या घरात ब्लेडने गळ्यावर वार करून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री च्या सुमारास घडली. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सलगरवस्ती पोलिसात यांची नोंद झाली असून या मागचे कारण समजले नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* लव्हे येथे विवाहितेस मारहाण
सोलापूर : लव्हे (ता. माढा) येथील कदम वस्तीत राहणाऱ्या पूनम धनाजी कदम (वय२५) हिला माहेरहून पैसे आण म्हणून मोबाईल फेकून तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली.तिला माढा येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा पती धनाजी कदम याने मारहाण केल्याची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
* घरगुती कारणावरुन विष प्राशन
धुळखेड (ता.इंडी जि. विजयपूर) येथे राहणाऱ्या विजय बाबु राठोड (वय१८) या तरूणाने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. त्याला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घरगुती वादातून त्याने हा प्रकार केल्याची नोंद सिव्हील पोलिसात झाली आहे .
* लोंढेवाडी येथे तरुणास मारहाण
सोलापूर : लोंढेवाडी (ता. माढा ) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर पूर्वीच्या भांडणातून काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत यशवंत शिवाजी लोंढे (वय२१) हा जखमी झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. त्याला माढा येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शंकर लोंढे आणि अन्य तिघांनी मारहाण केल्याची नोंद तालुका पोलिसात झाली आहे .