मुंबई : महाराष्ट्रात यावर्षी पावसामुळे आतापर्यंत 436 जणांचा बळी गेला आहे. तर सप्टेंबर महिन्यात 71 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला. याचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला. गेल्या 2 दिवसात मराठवाड्यातील पावसामुळे 11 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पाण्याखाली गेली आहे. सर्व माहिती घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेऊ, असे मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी म्हटले आहे.
सप्टेंबर महिना आता संपत आला आहे, मात्र तरीही आतापर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा प्रभाव कायम आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि इतर काही राज्यात खूप मुसळधार पाऊस पडत आहे. सप्टेंबरच्या अखेरीस मान्सूनचा प्रभाव संपत असतो आणि पाऊस थांबतो, मात्र, यावेळी तसं झालेलं दिसत नाही. ऑक्टोबर महिना तोंडावर आलेला असतानाही पाऊस सुरुच आहे. त्यामुळे शेतक-यांची दैना उडाली आहे.
राज्यात आतापर्यंत काही ठिकाणी 4 तर काही टिकाणी 8 वेळा अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. तर केवळ वीज कोसळून 196 जणांचा मृत्यू झाला आहे. “शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढू, धीर सोडू नका” असे मुख्यमंत्र्यांने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान गुलाब चक्रीवादळामुळे 2 दिवसात पावसाने अनेक भागात नद्या ओसंडून वाहत आहेत.
शेतीचं नुकसान झालं आहे. अनेकांना जीव गमवावा लागला, जनावर वाहून गेली आहेत. काही ठिकाणी 100 ते 150 मिली पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील 10 पैकी 7 जिल्ह्यात सरासरी 170 ते 190 मिली पाऊस झाला आहे.
उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टर आणि बोटीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आतापर्यंत 81 % पंचनामे झाले असून 19% पंचनामे उर्वरित आहेत. 17 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे पंचनाम्यात अडथळे येत आहेत.पंचनामे झाल्यानंतर 22 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान होण्याची अंदाज आहे. गुलाब चक्रीवादळामुळे 7 ते 8 हजार कोटीचं अंदाजित नुकसान झालं आहे. मागील 3 दिवसात उस्मानाबादमध्ये 6 जण तेरणा नदीच्या पाण्यात अडकले होते, त्यांना वाचवण्यात आलं आहे. यवतमाळमध्ये बसच्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अतिवृष्टीमुळे घरांचे अत्यल्प नुकसान, पालकमंत्र्यांची अडविली गाडी
सुदैवाने बुलडाणा, औरंगाबाद आणि लातूर येथे एकही मृत्यू नाही. मृतकांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील अतिवृष्टी भागाचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत असंही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, राज्यात अतिवृष्टीमुळे घरांचे अत्यल्प नुकसान झाले आहे.
1667 कच्ची घर अंशतः पडली आहेत. तर 19 घर पूर्ण पडली आहेत. उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा ताफा अडविला होता. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राज्यात गारपीट आणि त्यानंतर निसर्ग चक्रीवादळ, जून आणि ऑक्टोबर महिन्यात झालेली अतिवृष्टी या संदर्भात 9 डिसेंबर 2020 रोजी केंद्राला पत्र लिहिले होते. 3721 कोटींपैकी केवळ 701 कोटी रुपये मिळाले. तौत्के चक्रीवादळानंतर 2 जुलै 2021 रोजी 203 कोटी राज्याला मिळावे असा प्रस्ताव होता, पण काहीही मिळाले नाही. 1679 कोटी रुपये जूनमध्ये आलेल्या पूराच्या वेळी मिळावे असा प्रस्ताव होता पण काहीही मिळाले नाही. त्यामुळे आता पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय प्रस्ताव पाठवू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.