नवी दिल्ली : महात्मा गांधी यांची आज जयंती आहे. मात्र काही जण ट्विटरवर ‘गोडसे जिंदाबाद’ असे ट्विट करत आहेत. त्यावर भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे ट्विट करणे हे देशासाठी लाजिरवाणी बाब आहे, असे वरुण यांनी म्हटले आहे. दरम्यान महात्मा गांधींची आज 152 वी जयंती असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.
वरुण गांधी यांनी ट्वीट केले, भारत नेहमीच आध्यात्मिक महासत्ता राहिला आहे. पण महात्मा (महात्मा गांधी) यांनीच आपल्या राष्ट्राचा आध्यात्मिक आधार उंचावला आहे.
महात्मा गांधी यांची 152वी जयंती साजरी होत असून, जयंतीच्याच दिवशी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा उदो उदो करणारे ट्वीट ट्विटरवर केले जात आहेत. एकीकडे महात्मा गांधींना अभिवादन केलं जात असतानाच हा गोडसे जिंदाबाद हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. यावरून खासदार वरूण गांधींनी ट्वीट करत सुनावलं.
भाजप खासदार वरुण गांधी यांनी गांधी जयंतीनिमित्त सोशल मीडियावर ‘गोडसे जिंदाबाद’च्या ट्रेंडवर नाराजी व्यक्त केली आहे. वरुण गांधी म्हणाले की, जे ‘गोडसे जिंदाबाद’चे ट्वीट करत आहेत, हे लोक बेजबाबदारपणे देशाला लाजवत आहेत. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली. यासाठी गोडसेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वरुण गांधी यांनी ट्वीट केले, भारत नेहमीच आध्यात्मिक महासत्ता राहिला आहे. परंतु महात्मा (महात्मा गांधी) यांनीच आपल्या अस्तित्वाद्वारे आपल्या राष्ट्राचा आध्यात्मिक पाया व्यक्त केला आणि आपल्याला नैतिक अधिकार दिला जो आजही आपली सर्वात मोठी शक्ती आहे.
2 ऑक्टोबर हा दिवस भारतासाठी खूप महत्वाचा आहे. महात्मा गांधींचा जन्म याच दिवशी 1869 मध्ये गुजरातच्या पोरबंदरमध्ये झाला. 2 ऑक्टोबर हा दरवर्षी गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. गांधी जयंतीनिमित्त ट्विटरवर नथुराम गोडसे जिंदाबाद ट्रेंड करत आहे. 61 हजारांहून अधिक लोकांनी यावर ट्विट केले आहे. हे लोक नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ ट्विट करत आहेत. मात्र, सोशल मीडियावरही अनेकांनी या ट्रेंडवर टीका केली. महात्मा गांधी यांच्या जयंतीला ‘गोडसे जिंदाबाद’ चा नारा देत असा ट्रेंड करणारे देशाची लाज घालवत असल्याचे ट्विट वरूण गांधी यांनी केले आहे.
या ट्रेंडवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा घटना लाजीरवाण्या आणि बदनामी करणाऱ्या असून ट्विटरने असे हॅशटॅग चालवू नयेत, अशी मागणी केली आहे. वरुण गांधी यांनी संताप व्यक्त केल्यानंतरही ‘गोडसे जिंदाबाद’ हा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये दिसत होता.