मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज आहे. महागाई भत्त्यात तब्बल 11 टक्के वाढीचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. 1 जुलै 2021 पासून हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे.
रेल्वे कर्मचार्यांना केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिल्यानंतर आता राज्यातील कर्मचार्यांसाठी मोठी बातमी आहे. दसरा-दिवाळीच्या तोंडावर राज्यातील सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे कर्मचार्यांना केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिल्यानंतर आता राज्यातील कर्मचार्यांसाठी मोठी बातमी आहे. दसरा-दिवाळीच्या तोंडावर राज्यातील सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
2019 मधील महागाई भत्याची पाच महिन्यांची थकबाकीही देण्यात येणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात खुश करण्याचा प्रयत्न झाला आहे.
कोरोनामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गेले वर्षभर थांबवण्यात आला होता. मात्र आता आर्थिक स्थिती सुधारल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यामध्ये 1 जुलैपासून 17 टक्यावरून वरून 28 टक्यांपर्यंत 11 टक्यांची वाढ केली आहे. ऑक्टोबरपासून हा वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार असून जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यातील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे 1 जुलै ते 30 नोव्हेंबर दरम्यानच्या पाच महिन्यातील 10 टक्के वाढीव महागाई भत्याची थकबाकीही ऑक्टोबरच्या वेतनासोबत देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांबाबतही सरकारने लवकर निर्णय घ्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केला आहे.