सोलापूर : केंद्र सरकारच्या विरोधात आणि शेतकऱ्यांवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील पक्षाने पुकारलेल्या बंद मध्ये ‘सहभागी व्हा’ असे आवाहन करणाऱ्या महाविकास आघाडीच्या 100 जणांना पोलीसांनी अटक करून त्यांची सुटका केली.
फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉग्रेसचे चेतन नरोटे, लक्ष्मीनारायण दासरी यांच्यासह 32 जण, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंद्रकांत उत्तम दिक्षित व इतर 10 जण, सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवसेनेचे पुरूषोत्तम बरडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भारत जाधव, कॉग्रेसचे आंबादास करगुळे व इतर 14 जण आणि नरसय्या आडम मास्तर यांच्यासह 22 जण तर जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिमाशंकर मंजेली, युसुफ हनिफ शेख, अनिल वासम व इतर 12 हे सर्वजण केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करीत होते.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान त्यांना चिरडून शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलाच्या विरूध्द घोषणाबाजी करताना आढळून आले. यामध्ये कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने बंद पुकारला होता. त्या दरम्यान हा बंद यशस्वी व्हावा म्हणून हे सर्वजण घोषणाबाजी करीत असताना पोलीसांनी एकूण 100 जणांना ताब्यात घेवून त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* बंदोबस्तात कसुरी करणाऱ्या दंगा नियंत्रण पथकातील 8 जणांविरूध्द कारवाई
सोलापूर : सोलापूर पोलीस आयुक्तालयातील दंगा नियंत्रण पथकातील 8 जणांवर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय पक्षाकडून एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला होता. त्या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सोलापूर शहर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामध्ये दंगा नियंत्रण पथकातील काहीजण वाहनात न थांबता लांब कुठेतरी थांबलेले आढळून आले.
दंगा नियंत्रण पथकातील प्रत्येकाने आपल्याला दिलेल्या साधन आणि शस्त्रासह सज्ज राहणे आवश्यक आहे. परंतु काहीजण गाडीत नव्हते त्यावेळी पोलीस निरीक्षकांनी त्याबाबतचा अहवाल पोलीस आयुक्तांना दिला. त्याचवेळी पोलीस आयुक्तांनी तातडीने बंदोबस्तात नसलेल्या 8 जणांना दोन वर्षासाठी वेतनवाढ रोखण्यात का येवू नये, अशी नोटीस दिली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दिपाली धाटे यांनी दिली.
* भिंतीला छिद्र पाडून कारखान्यात चोरी