गोवा : शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. पवार साहेब मोठे आहेत त्यामुळे मोठ्यांना फार उत्तर देता येत नाहीत. मात्र आपण असेही म्हणू शकतो की शरद पवार यांना पंतप्रधान पद मिळाले नाही म्हणून त्यांच्या मनात वेदना आहे. राजकारणात असे बोलावे लागते, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एका इलेक्ट्रानिक माध्यमाला फडणवीस यांनी मुलाखत दिली. त्याता फडणवीसांनी म्हटलं आहे की, पवार साहेब मोठे आहेत त्यामुळे मोठ्यांना फार उत्तर देता येत नाहीत. मात्र आपण असेही म्हणू शकतो की शरद पवार यांना पंतप्रधान पद मिळाले नाही म्हणून त्यांच्या मनात वेदना आहे. राजकारणात असं बोलावं लागतं, असं ते म्हणाले.
त्यांनी म्हटलं की, सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे हे खरे आहे परंतु त्यासाठी आम्ही हात पाय गळून बसलो नाहीत. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही पण याच्या खूप पुढे गेलो. गेल्या दोन वर्षात मी राज्य पिंजून काढलं आहे. विरोधी पक्षनेता म्हणून काम करत आहे. पूर, वादळ, अतिवृष्टी या काळात आम्ही लोकांमध्ये आहोत. लोकांचा रोष सरकार बद्दल आहे आणि तो संघटित करण्याचं काम आम्ही करतोय. आम्ही जनतेचे लोक आहोत आणि जनतेकरता काम करत आहोत, असं ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलताना ते म्हणाले की, सरकारने यापूर्वी जी मदत घोषित केली होती तरी पोहोचली आहे का? आधी सरकारने त्या मदतीचा आढावा द्यावा. आकडेवारी फेकायची या पलीकडे हे सरकार काहीही करत नाही. शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत. या सरकारमध्ये प्रत्येक जण मुख्यमंत्री आहे जनतेची चिंता कोणालाही नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अनिल देशमुख यांच्याविरोधात कारवाया कोर्टाच्या आदेशानुसार सुरू आहेत. आयकर विभागाला एक हजार कोटी रुपयांच्या दलालीचे कागदपत्र सापडले आहेत. एक हजार कोटी रुपयांची दलाली होत असेल तर केंद्र सरकारने काय चुपचाप बसायचं का? असंही ते म्हणाले. हे दलाल कोण आहेत? हे कुणाचे पैसे आहेत? कुठून पैसे येतात? ते कुठे पैसे जातात ? हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. एकीकडे मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना पैसा मिळत नाही आणि दुसरीकडे हजारो कोटी रुपयांची दलाली होत आहे हे गंभीर आहे. या सगळ्या दोषींवर कारवाई व्हायला हवी ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. महाराष्ट्रात खंडणी वसुलीचे काम सुरू आहे, असं फडणवीस म्हणाले.
मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही, असं जाहीर विधान फडणवीसांनी केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती.
फडणवीसांना अद्यापही ते मुख्यमंत्री आहेत असं वाटतं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे, असंही शरद पवार म्हणाले. याबाबतीत मी थोडा कमी पडतो. चारवेळा मुख्यमंत्री राहूनही मला फडणवीसांसारखं वाटत नाही. त्यामुळे मी पुन्हा येईनची त्यांची जखम किती सखोल आहे हे त्यातून दिसतं, असा टोला पवारांनी लगावला होता. त्यावर आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
फडणवीस म्हणाले कि, ‘शरद पवार मोठे आहेत त्यामुळे मोठ्यांना जास्त उत्तरे द्यायची नसतात. आपण असेही म्हणू शकतो की, त्यांना पंतप्रधान पद मिळाले नाही त्यांची वेदना त्यांच्या मनात सलत आहे. या सगळ्या गोष्टी राजकारणात बोलाव्या लागतात. तुमच्या विरोधकांना उत्तरे द्यावी लागतात. सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे हे कुठल्याही पक्षाला वाटते पण आम्ही हातपाय गाळून बसलेलो नाही. विरोधी पक्षाचे उत्तम काम करत आहोत आम्हाला काही चिंता नाही,’ असे फडणवीस म्हणाले.