सोलापूर : विविध सण, उत्सव, पुण्यतिथी आणि जयंतीदिनी आपल्या कलेद्वारे अभिनव पद्धतीने अभिवादन करणारे दमाणी विद्या मंदिर येथील कलाशिक्षक व चित्रकार मल्लिनाथ जमखंडी यांनी नवरात्रीनिमित्त कवड्यांवर देवीची रूपे साकारली आहेत.
पूर्वीच्या काळी कवडी हे वस्तू विनिमयाचे पैशाचे साधन होते. कवडी लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या दृष्टीने सांस्कृतिक महत्त्व असणारे प्रतीक कवड्याची माळ ही अंबाप्रिय वस्तु आहे देवीच्या उपासनेत कवडीला असाधारण महत्व आहे. कवडी हे वांझपणाचे निराकरण करण्यासाठी वापरली जाते.
कवड्यांमध्ये सर्व प्रकारच्या अनिष्टांचे निराकरण करण्याचे सामर्थ्य असल्यानेच छत्रपती शिवरायांनी तिला वंद्य मानले होते. म्हणूनच ते मोहिमेवर जाण्यापूर्वी अथवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयापूर्वी कवड्यांच्या माळेला वंदन करून ‘जगदंब जगदंब’ असा उच्चार करत.
तुळजापूर येथील कवडी माळेत ६४ कवड्या असतात. या कवड्या ६४ कलांचे प्रतिक आहेत असे मानले जाते म्हणूनच अंबाप्रिय आणि कलेच्या उपासकांसाठी वंद्य असणाऱ्या कवड्यांवर कलाशिक्षक मल्लिनाथ जमखंडी यांनी तुळजापूर निवासिनी श्री तुळजाभवानी, करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी, सप्तशृंग निवासिनी श्री सप्तशृंगी व सौंदत्तीची रेणुका यल्लमा देवी व दुर्गा देवीची चित्रे साकारली आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ॲक्रॅलिक रंग या माध्यमाचा वापर करून देवीची साडेतीन शक्तीपीठे साकारली आहेत. यासाठी तीन तास अवधी लागला असून सर्वात लहान कुंचल्याचा वापर केला आहे.
दरम्यान गणेशोत्सवात वृक्ष गणपती, अन्न गणपती, मृदा गणपती अशा पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. वृक्ष गणपतीमध्ये मातीत बिया मिसळून व गणेशाच्या अलंकारासाठी लहान-लहान धान्यांचा वापर केला जातो. वृक्षसंवर्धन व वृक्षारोपणासाठी तो बाप्पा प्रेरक असतो.
कलाशिक्षक तथा चित्रकार मल्लिनाथ जमखंडी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिकांनी पर्यावरणपूरक मूर्ती बनविल्या होत्या. या पर्यावरणपूरक गणेशमूर्त्यांची खूपच वाहवा झाली होती. अनेकांनी यास पसंती दाखवली होती. याविषयी पर्यावरणपूरक गणपती मूर्तीची माहिती दिली होती. हे पाहून शिक्षकांनीही मूर्त्या बनवल्या होत्या.
अन्न गणपती हा धान्याच्या पिठापासून बनविला जातो. जलचरांसाठी तो पूरक ठरतो. मृदा गणपती हा तांबड्या मातीपासून बनविला जातो. ती मूर्ती आपण घरातील मोठ्या भांड्यात विसर्जन करू शकतो. शाळेतील सर्व शिक्षिकांनी त्या मूर्ती नेल्या असून त्याच्यातून मुलांनाही प्रेरणा मिळाली होती. प्रशालेतील कलाशिक्षक मल्लिनाथ जमखंडी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिकांनी पर्यावरणपूरक मूर्ती बनविल्या होत्या.