पुणे : राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही चर्चा फेटाळली आहे. महाविकास आघाडी स्थापन झाली, तेव्हाच या सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडे राहणार, हे एकमताने निश्चित करण्यात आले होते, असे शरद पवार यांनी आज स्पष्ट केले आहे. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी तयार नव्हते, मात्र मीच त्यांना नेतृत्व करण्यास सांगितले, असेही पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पिंपरी चिंचवड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र सरकार कशा पद्धतीने यंत्रणांचा चुकीचा वापर करत आहे, याचा पाढाच पवारांनी वाचून दाखवला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मतं मांडली. मात्र, यात त्यांनी चुकीचा आरोप केला.. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही, असं वक्तव्य चुकीचे आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली मतं मांडली. त्यात ते म्हणाले उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण मी सांगतो की स्वतः सत्ता स्थापन करताना त्यात हस्तक्षेप केला होता. जेव्हा चर्चा सुरू होती की नेतृत्व कोणाकडे द्यायचं. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांचे हात वर केले, त्यांच्या ध्यानीही नव्हतं अन् मनीही नव्हतं. मीच म्हटलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. माझी फडणवीस यांना हात जोडून विनंती आहे की असे आरोप करू नका. हे योग्य नाही. स्वतः फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरंच काही माहिती आहे, अशी माहिती शरद पवार यांनी माध्यमांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वसुलीची चीप अथवा सॉफ्टवेअर त्यांनी दाखवावं. ते मुख्यमंत्री होते, पण त्या पदाला एक मान-सन्मान आहे. मी पण त्या पदावर होतो. मात्र, त्या पदाला फडणवीस धक्का पोहचवत आहेत. मला फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. महाराष्ट्राचा बंगालशी एक घरोबा आहे. त्याला एक मोठा इतिहास आहे. यासाठी शरद पवारांनी बंगाली बोलून दाखवलं हे ऋणानुबंध जुने आहेत. ते आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
यंत्रणेवर आरोप केला तर भाजपचे नेते खुलासा द्यायला पुढे येतात. त्या यंत्रणेच्या प्रमुखांनी उत्तर दिलं तर समजू शकतो, पण भाजप जर त्यावर बोलत असेल. तर याचा स्वच्छ अर्थ आहे की भाजप ह्यांना चालवतं. महाविकासआघाडी सरकार ढासळत नसल्याने, भाजप अस्वस्थ आहे. त्यामुळं राजकीय आकसाने हे होतंय. केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मी पुन्हा येईन, पण पुन्हा यायचे काही जमेना, असे म्हणत पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ‘तुम्ही काहीही करा, हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल’ असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
तसेच अस्वस्थ झालेले हे लोक सत्तेचा गैरवापर करून राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ईडी, एनसीबीच्या या कारवाया द्वेषापोटी होत असल्याचे ही पवार या वेळी म्हणाले.आता राज्यातील सरकार स्थिर आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचा गैरवापर करत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तुम्ही दवाबतंत्राचा वापर करा, छापे टाका. तुम्ही काहीही करु शकता. तरीही आघाडी सरकार आपलाकार्यकाळ पूर्ण करेलच, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
* अजित पवारांच्या बहिणींच्या घरी केलेल्या छापेमारीत 184 कोटी बेहिशेबी मालमत्ता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या घरी नुकतीच आयकर विभागाने छापेमारी केली होती. या छापेमारीतून सुमारे 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. छापेमारी दरम्यान गोळा केलेल्या पुराव्यामुळे प्रथमदर्शनी अनेक बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार उघड झाले आहेत. दोन्ही व्यवसाय समुहांपासून सुमारे 184 कोटीच्या बेहिशेबी उत्पन्नाचा पुरावा देणारी धक्कादायक कागदपत्रे सापडली आहेत.